तुळशी या वनस्पतीचे अधिक संवर्धन आणि वृद्धी व्हावी यासाठी ढाणकी शहरातील दांपत्याचा स्तुत्य उपक्रम


प्रवीण जोशी(प्रतिनिधी)

श्रावण महिना हा भक्ती भावनेचा मानला जातो स्वाभाविकच आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव असतात विशेष करून हर हर महादेव या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमलेला बघायला मिळतो. तसेच तुळस हे दैनंदिन जीवनात किती उपयुक्त आहे याची जाणीव व्हावी या हेतूने ढाणकी येथील ऋतिक ट्रेडर्सचे संचालक आशिष कोडगिरवार हे अनोखे शिव धनुष्य हाती घेऊन ते पूर्णत्वास नेत आहेत. श्रावण महिन्यातील अगदी पहिल्या दिवसापासूनच या संकल्प ला सुरुवात झाली वारकरी सांप्रदायात तर तुळशीस अनन्यसाधारण महत्त्व आहे. जग कितीही आधुनिक तिकडे गेले तरी आपल्या दैनंदिन जीवनात आयुर्वेदिक बाबीस तितकेच महत्त्व आहे. म्हणूनच सर्वसामान्य लोकांमध्ये अधिकाधिक जागृती व्हावी व आपल्या संस्कृतीत तुळशीचे महत्त्व हे क्षितिजासारखे अमर्याद आहे म्हणून तुळशी वृंदावन डोक्यावर घेऊन ढाणकी ते हरदडा असा पाच किलोमीटरचा प्रवास निर्वाणी पायाने करत आहे त्यामुळे मला एक वेगळी वर्षभर पुरेल एवढी सकारार्थी ऊर्जा मिळत आहे. या माझ्या कार्यास सहचरणी गौरीची सुद्धा तेवढीच मदत मिळत आहे. असे आशिष यावेळी म्हणाले तुळशीमुळे अनेक रोग बरे करण्यास आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुळशी खूप प्रभावी आहे ही वनस्पती शरीराची प्रतिकारशक्ती वाढवीते आणि जिवाणू आणि विषाणू जन्य संक्रमणाशी लढा देते म्हणून या वनस्पतीची समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे त्याचे संवर्धन होऊन व अधिकाधिक रोपण होऊन त्याचा फायदा सर्वसामान्यांना व्हावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविला असे आशिष यांनी सांगितले यानिमित्ताने अनेकांना तुळशीच्या रोपाचे वाटप सुद्धा करण्यात आले आहे. त्यामुळे या दांपत्याचे सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे