
सहसंपादक : रामभाऊ भोयर
कोल्हे सभागृहात वंचित बहुजन आघाडी तालुका राळेगावं च्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निरज वाघमारे हे बोलतांना म्हणाले की या देशात सध्या भारतीय जनता पार्टीचे सरकार कार्यरत असून या सरकारच्या माध्यमातून संविधान व लोकशाही पूर्णपणे पायदळी तुडविल्या जात असून संविधान व लोकशाही धोक्यात आली आहे तेव्हा देशातील संविधान व लोकशाही वाचवायची असेल तर देशातील सर्व शोषित पिढीत घटकांनी एकत्र यायला पाहिजे असे मत या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान बोलतांनी व्यक्त केले. सर्वेसर्वा मा,प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात निर्माण झालेल्या वंचित बहुजन आघाडीचे काम संपूर्ण देशभरात मोठ्या जोमाने सुरू असून, पिढीत,वंचित घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण देश पिंजून काढत आहे,हेच बाळासाहेब आंबेडकर यांचे आव्हान पेलून संपूर्ण देशभर वंचित बहुजन आघाडी मोठ्या जोमाने काम करत आहे, त्याचा एक भाग म्हणून राळेगाव येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच या कार्यकर्ता मेळावा दरम्यान अँड मधुसूदन अलोने यांनीही आपले मनोगत व्यक्त केले असून उपस्थित कार्यकर्त्यांना शत्रू व मित्रांची ओळख करून देतांना अत्यंत जोशपूर्ण विचार व्यक्त करतांना सांगितले की आपले शत्रू खऱ्या अर्थाने या देशातील आर एस एस,बीजेपी हेच असून यांच्या मुळेच लोकशाही व संविधान पूर्णपणे धोक्यात आले आहे त्यामुळे आता सर्व सविधान वादी व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या लोकांनी कंबर कसून एकत्र आले पाहिजे असे विचार त्यांनी व्यक्त केले, आहे. या कार्यकर्ता मेळाव्याला प्रमुख उपस्थिती वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष मा, धम्मवतीताई वासनिक यवतमाळ(पूर्व)मा,लक्ष्मण लोळगे,जिल्हा संघटक,मा. डॉ. ओमप्रकाश फुलमाळी व सर्वच जिल्हा कार्यकारिणी चे पदाधिकारी उपस्थित होते,सदर कार्यकर्ता मेळावा यशस्वी करण्यासाठी,वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष, विकास मुन,दिपक आटे,कायदेशीर सल्लागार अँड मधुसूदन अलोने, प्रकाश कळमकर, संतोष घनमोडे, अजय जारोंडे,लोकेश दिवे, दिनेश धनविज,व सर्व तालुका पदाधिकारी तसेच तालुक्यातील वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
