
सहसंपादक : रामभाऊ भोयर
मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा अधिनियम 2009 मधील कलम 21 नुसार दोन वर्षाचा कालावधी पूर्ण केलेल्या शाळा व्यवस्थापन समितीचे नव्याने पुनर्गठण करण्यात आले.
आज दिनांक 16/12/2023 रोज शनिवारला सकाळी 8.30 वाजता यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पालकांची सभा घेऊन सर्व घटकांना प्रतिनिधित्व देत शाळा व्यवस्थापन समिती सदस्य निवड करण्यात आली त्यावेळी निलेश भाऊ गुजरकर यांची अध्यक्षपदी तर कविताताई रामदासजी धोटे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. सदस्य म्हणून सीमा अमोल चांदेकर ,शुभांगी सुभाष बेहेरे,प्रणाली नागेश मडावी, रणजीत किसनाजी चांदेकर, नामदेव चिंदूजी हुलके, रामू नानाजी घडले व उच्चशिक्षित सदस्य म्हणून शुभम विलासराव धोटे यांची निवड करण्यात आली या झालेल्या सभेला गावातील पोलीस पाटील समीर भाऊ गुजरकर व गुप्ता सर समीर दौलत्कार सर व गावातील प्रतिष्ठित नागरिक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य गणाचा गावातील सरपंच मनीषाताई वानखेडे उपसरपंच अभय मासुरकर ग्रामपंचायत सदस्य नरेश भाऊ आत्राम, सिमाताई संजय बेहरे, जनाबाई सुरेश तडस व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी या नवीन समितीचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले
