
सहसंपादकं: रामभाऊ भोयर
राष्ट्रीय युवा प्रबोधनकार राज रामरावजी घुमणर कांदळी दिग्रस तालुका यवतमाळ हे ठीक ठिकाणी राष्ट्रीय प्रबोधन आपल्या माध्यमातून करीत असतात. व त्यांना नवीन दिशा देण्याच्या काम करीत असतात. ते महाराष्ट्रभर ठीक ठिकाणी फिरून युवकांना जागृत करीत असतात. संत ,महापुरुष यांचे विचार आपल्या वाणीतून पसरवून ठिकठिकाणी प्रबोधन करीत असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे संस्थापक सचिव श्रीकृष्ण देशभ्रतार व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे संजीव भांबोरे यांनी त्यांना सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र ,पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे सन्मानित करण्यात आले. यावेळी दैनिक माझा मराठवाडा वर्तमान पत्राचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर छत्रपती संभाजीनगर ,शांतीवन बुद्धविहाराचे संस्थापक अध्यक्ष धम्मरक्षित जीवनबोधी बौद्ध (मेश्राम ),रामरावजी गाडेकर प्रभारी भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश, सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
