
सहसंपादक : रामभाऊ भोयर
देशाला जगात एक वेगळी ओळख करून देणारे देश विकासाला प्राधान्य देणारे विकास पुरुष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील नेते व प्रधानमंत्री असेल यात माझ्या मनात थोडी ही शंका नाही आणि महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वात जास्त जागांवर युतीचेच उमेदवार निवडून येतील याचाही मला विश्वास आहे यासाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रमुखांपासून तर लाभार्थी प्रतिनिधी पक्षाचा कार्यकर्ता प्रत्येक सेलचे प्रमुख विधानसभेचे प्रमुख स्थानिक कार्यकर्ता यांनी स्वतःला या रणसंग्रामात झोकून देऊन प्रामाणिकपणे काम करावे लागेल असे प्रतिपादन प्रवीण दरेकर गटनेते भारतीय जनता पार्टी तथा अध्यक्ष मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी लाभार्थी संपर्क अभियान प्रशिक्षण वर्गाला मार्गदर्शन करताना केले . राळेगाव येथे केले दिनांक 13 मार्च 2024 ला वसंत जिनिंग येथील स्वर्गीय भाऊसाहेब कोल्हे सभागृहात लाभार्थी संपर्क अभियान प्रशिक्षण वर्गाचे आयोजन राळेगाव विधानसभा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा जिल्हा अध्यक्ष तारेन्द्र बोर्डे होते .राळेगाव प्रमुख मार्गदर्शक प्रवीण दरेकर गटनेते भाजपा विधान परिषद , आ प्रा डॉ अशोक उईके , राजेंद्र डांगे अध्यक्ष प्रदेश भाजपा ओबीसी सेल अमन गावंडे संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बाळासाहेब शिंदे जिल्हा लाभार्थी प्रमुख अनिल राजूरकर जिल्हा सरचिटणीस चित्तरंजन दादा कोल्हे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी राळेगाव सतीश मानलवार विधानसभा प्रमुख, कैलास बोंद्रे तालुका अध्यक्ष कळंब वीरेंद्र तोडकरी तालुका अध्यक्ष पांढरकवडा नितीन परडके तालुकाध्यक्ष बाबु बाभुळगाव संदीप वैद्य अनिकेत पोहकर डॉक्टर कुणाल भोयर शहराध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित होते मार्गदर्शन करताना प्रवीण दरेकर यांनी प्रशिक्षणार्थ्याला सांगितले की हा प्रशिक्षण वर्ग नेमका कशासाठी आयोजित केलेला आहे हे आपल्याला प्रामुख्याने समजले पाहिजे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण तयार असलं पाहिजे ते म्हणाले देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना देशातील सामान्य माणसाकरिता राबविल्या आहे त्याची माहिती घराघरात पोहोचविणे गरजेचे आहे त्याकरिता मोदीजींचा नमस्कार लाभार्थ्यापर्यंत सांगणे नमो अॅप चा उपयोग करणे प्रत्येक विधानसभेमध्ये सर्वच पदाधिकारी बूथ प्रमुख केंद्रप्रमुख सुपर वॉरियर्स यांनी मतदार संघात प्रवास करणे गरजेचे आहे याबाबत माहिती दिली व महाराष्ट्रात युतीचेच उमेदवार निवडून येतील यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन केले . कार्यक्रमाचे प्रास्तावीक राळेगांव विधानसभा मतदार संघाचे आ प्रा डॉ अशोक उईके यांनी केले या प्रशिक्षण वर्गाच्या आयोजनामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली राळेगाव विधानसभा क्षेत्रात लाभार्थी संपर्क अभियान जोरात राबविणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले यासाठी सर्वच प्रकारचे नियोजन स्थानिक स्तरांपासून केलेले आहे त्यात लाभार्थी संपर्क अभियान संकल्प पत्राचे संकलन बूथ प्रमुखांची कार्य सर्वच सेल प्रमुख मंडल प्रमुख भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मेहनत घेऊन पक्ष संघटन मजबूत करीत आहे व येणाऱ्या लोकसभेत राळेगाव मतदार संघातून युतीचा उमेदवार जो कोणी असेल त्याला आम्ही भरघोस मते देऊन या ठिकाणाहून विजयी करण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी उपस्थितां समोर सांगितले कार्यक्रमाचे संचालन निखिल राऊत यांनी तर आभार प्रदर्शन भाजपा ता अध्यक्ष चित्तरंजन कोल्हे यांनी केले कार्यक्रमाला राळेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुण्यांचे स्वागत आदिवासी नृत्याने केले कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद पाहायला मिळाला .
