
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी च्या परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक 27 रोजी जाहीर करण्यात आला आहे. त्यात राळेगाव शहरातील न्यू इंग्लिश हायस्कूल च्या एस. एस. सी. परीक्षेचा निकाल हा 97.79 % लागलेला आहे.
सन 2024 या वर्षा करीता शाळेतून एकूण 318 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते.त्यापैकी 311 विद्यार्थी या परीक्षेत उतीर्ण झालेले आहेत. उतीर्ण झालेल्या विद्यार्थांमधून कु. जानन्वी गणेश ठाकरे 95.20.टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह राळेगाव तालुक्यातून प्रथम येण्याचा मान शाळेसह, विद्यार्थीने मिळविला आहे. तर कु. समीक्षा कोहाळ 94.0 टक्के गुण मिळाले असून ती शाळेतून द्वितीय क्रमांकाने उतीर्ण झाली आहे.तर कु यामिनी नंदरे व कु. आरोशी खोब्रागडे यांना अनुक्रमे 93.20 टक्के गुण मिळाले आहे.तसेच यावेळी शाळेतून मुलींनी 10 वी च्या निकालात बाजी मारली आहे. सर्व विद्यार्थीच्या यशा मागे शाळेत होणारे शैक्षणिक उपक्रम व शिक्षक, विद्यार्थी यांच्यात शैक्षणिक संवाद महत्वाचे मानल्या जात आहे. दहावी च्या परीक्षेत
सर्व यशस्वी विद्यार्थांचे संस्था अध्यक्ष भाऊराव धर्मे, सचिव डॉ. सौं. अर्चनाताई धर्मे , मुख्याध्यापक प्रा. जितेंद्र जवादे, उपमुख्याध्यापक विजय कचरे,पर्यवेक्षक सुरेश कोवे व शाळेतील सर्व शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विध्यार्थ्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. तर
यशस्वी विद्यार्थांनी आपल्या यशाचे श्रेय संस्था अध्यक्ष,शिक्षक वृंद व आपल्या पालकांना दिले आहे… .
