
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्या अंर्तगत येत असलेल्या झरगड येथे हनुमान जयंती उत्सवा निमित्ताने हनुमान मंदिर व गुरूदेव सेवामंडळ यांच्या वतीने दिनांक १० एप्रिल रोज रविवार ते १७ एप्रिल शनिवार पर्यंत संगीतमय श्रीमद भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन भागवताचार्य ह.भ.प.श्री कुमारी वृंदाताई पुणेकर पलाना जि वासिम यांचे अमृतमय वाणीतून करण्यात आले आहे तसेच साथसंगत गायक वासुदेव पुणेकर तबला वादक पाढुरंग पदकीनी सोईट आँर्गण वादक सुरेश तरवटकर पँड वादक संकेत वरधने झाकी कार यांची साथ लाभणार आहे तर दैनंदिन कार्यक्रम रोज ग्रामसफाई सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत व रात्री ८ ते १० वाजेपर्यंत भागवत वाचन राहील सकाळी कलश स्थापना १० वाजता गावातून पालकी मिरवणूक व हनुमान आरती व भागवत वाचनाला सुरुवात होईल
दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता गावातून ग्रथ मिरवणूक
१२ वाजता काल्याचे किर्तन ह.भ.प.वृंदाताई पुणेकर यांचे व लगेच महाप्रसादाला सुरूवात करण्यात येईल तरी सर्व भाविक भक्तानी भागवत सप्ताहाचा लाभ घ्यावा अशी विनंती जय हनुमान मंदिर व गुरूदेव सेवामंडळ झरगड यांनी निवेदन करण्यात आली आहे.