महसूल साप्ताहिक सप्ताह निमित्त वृक्षारोपण.

राळेगाव तहसील येथील दुय्यम निबंधक राळेगाव या कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतिच्या आवारात वृक्षरोपण करतांना श्री.बाळासाहेब घोंगडे, सह जिल्हा निबंधक वर्ग १ यवतमाळ यांच्या वतीने आज रोजी मुद्रांक जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते राळेगाव तहसील परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, त्यात विविध प्रकारचे झाडे लावून त्यांना जोपासण्याची जबाबदारी मुद्रांक विक्रेता सुभाष चौधरी यांनी घेवून वृक्षारोपण केले त्या वेळी तहसील कार्यालयातील घोंगडे दुय्यम निबंधक, रोशन पवार, मुद्रांक विक्रेते सुभाष चौधरी मुद्रांक जिल्हाधिकारीकार्यालयातील अव्वल कारकून योगेश ढवळे दस्त लेखक गणेश धांदे तसेच सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर डाखोरे, संदीप बेडदेवार यांच्या उपस्थिती आज रोजी तहसील कार्यालयातील पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला त्यामध्ये आज रोजी पर्यंत न झालेला कोणताही उपक्रम मुद्रांक विक्रेता यांच्याकडून महसूल सप्ताह निमित्त साजरा करण्यात आला त्यात सर्व मान्यवर हजर होते, या उपक्रमाची श्रुती सर्व स्तरावरून करण्यात येत आहे.