
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
डॉ कुणालभाऊ बाबारावजी भोयर यांनी आरोग्य क्षेत्रात अतुलनीय कार्य केले. गोर गरीब जनतेची सेवा केली. त्यांच्या वडिलांचा वारसा ते चालवत आहे. याची दखल घेत राळेगाव भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र दिनाचा 74वा वर्धापन दिन शासकींय कार्यक्रमा मधे तालुका उपविभागीय अधिकारी शैलेश जी काळे माननीय तहसीलदार डॉ रवींद्र जी कानडजे ,आणी तालुका संघचालक श्रीं भूपत भाई कारीयां श्रीं अंकुशराव जी रामगडे आणी इतर मान्यवर यांच्या उपस्थिती मधे धनजी भाई कारीयां स्म्रुती पुरस्कार डॉ कुणालभाऊ बाबारावजी भोयर याना प्रदान करण्यात आला त्याच प्रमाणे शासना तर्फे कोरोना योध्या म्हणुन सन्मानपत्र देण्यात आले.
माननिय डॉ कुणालभाऊ बाबारावजी भोयर याना मिळालेली पुरस्कार राशी 8000 ही दिव्यांगांसाठी काम करणारी सक्षम या संस्थेला दान म्हणुन देण्यात आली त्या पुरस्कार चि रक्कम राळेगावं शहरातील गणमान्य नागरिकांच्या उपस्थीती मधे श्रीं नितीन जी घोडे याना सुपूर्द करण्यात आला.
