संस्कृतीला अनुसरून चिमुकल्या आरोही चौधरी ने साकारली नेत्रदीपक रांगोळी सर्वत्र होत आहे कौतुक


प्रतिनिधी:प्रवीण जोशी
ढाणकी


सणासुदीच्या काळात रांगोळी हा महिला मंडळींचा व मुलीचे एक वेगळे अतूट नाते गेल्या अनेक कालखंडापासून बनले आहे. एखादया वेळी सण उत्सव असल्यास उंबरठा असेल त्या ठिकाणी रांगोळी रेखाटलेली दिसते आणि यास सत्यात उतरवायचे असल्यास स्त्री शिवाय पर्याय नसते. रांगोळी दिसली म्हणजे मंगल प्रसंग आहे असे सहजपणे ओळखून पडते. पण आजकाल रांगोळी ही पुरातन कलाकृती साचेबंद बनलेली असताना हाताने टिंबाच्या आयाता कृती मधून सांकेतिक आकड्यात जोडण्याची कला जणू महिला सुद्धा विसरत चालल्या की काय असा यक्षप्रश्न पडतो.
दिवाळीचा आनंद लहान चिमुकली फटाके फोडून घेत असताना ढाणकी शहरातील आरोही चौधरी ही अतिशय सुंदर रांगोळ्या काढून सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. सध्या हाताने रेखाटून रांगोळ्या काढण्याचे प्रमाण अल्प होत असताना साच्या घेतला आणि त्यावर रांगोळीचे पीठ टाकले की आपल्याला पाहिजे असलेल्या स्वरूपातील यथायोग्य रांगोळी काही क्षणात तयार होते. पण त्या निर्मितीला कोणत्याही प्रकारच्या संकल्पनेचा व ठेवेचा वसा चिकटलेला नसतो.
व्यंगचित्र किंवा रांगोळी ही कला संकल्पनेतून प्रवर्तित होऊन ती पटलावर येते म्हणूनच त्यास कला असे संबोधले जाते.पण अगदी भुलाबईचे गाणे म्हणण्याचे वय असताना महाराष्ट्राची संस्कृती स्त्रियांचा पैहरावा हा साडी आणि वेणी आहे ही शोधीत कल्पना करून रांगोळी साकारल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ही चिमुकली एक उपासक का ठेरू नये. येणाऱ्या काळात ही चिमुकली या संस्कृतीला सोन्याचे दिवस आणल्याशिवाय राहणार नाही. तसेच विविध स्तरावर स्पर्धेतून सहभाग घेऊन परिसराचे नाव मोठे सुद्धा करू शकते.