EVM च्या विरोधात बेरोजगारांचा आक्रोश,EVM ऐवजी बँलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी..-संघशिल बावणे, जिल्हाध्यक्ष भारतीय विद्यार्थी मोर्चा.

प्रतिनिधी:रजत रोहनकर, आष्टी

नोकरी नाही तर सरकार नाही #Burn_EVM_Save_Democrecy.
twitter trend …

देशातील वाढत्या बेरोजगारी विरोधात भारतीय बेरोजगार मोर्चाचे इ.वी.एम. ची प्रतिकात्मक प्रतीमा जाळून आंदोलन..

भारत जगातील सर्वात जास्त युवा असलेला देश आहे. ईथे ३५.६ करोड लोकसंख्या युवकांची आहे. पण आज प्रत्येक घरी एक युवा बेरोजगार आहे. ज्या देशाची ओळख युवकांच्या नावावरून होते, तेच आज बेरोजगार आहेत. आमच्या युवांना वाटते की रोजगार नाही म्हणून आम्ही बेरोजगार आहोत. पण सत्यता तर ही आहे की, बेरोजगारी जी समस्या आहे ती इथल्या व्यवस्थेशी जुळलेला विषय आहे. देशात वाढत असलेली बेरोजगारी ही जाणूनबुजून षडयंत्र करुन वाढवत आहेत आणि हे वाढवायचं काम ई वी एम ने निवडून आलेली केंद्र व राज्य सरकार करत आहे.
NRCB च्या रिपोर्ट नुसार देशात प्रतीदिन ३८ सुशिक्षित युवा आत्महत्या करत आहेत. पण केंद्र व राज्य सरकार याकडे लक्ष न देता आपआपले हित जपत आहे.
जर बेरोजगारीची जननी EVM ला संपवायचं असेल तर EVM ऐवजी बंलेट पेपरने मतदान घ्यावे यासाठी संघर्ष करावं लागेल.याकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरीता प्रतीकात्मक evm चे दहन करुन सरकारचा निशेध करण्याता आला,

सरकारला जाग करायला या आंदोलनाचे तिसऱ्या चरणी १७ मे ला प्रतीकात्मक डिग्री जाळून आंदोलनं होणार.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघशील बावणे, स्वप्नील धुरके, साहिल साखरकर, अमित नगराळे, अखिल नीमगडे, शुभम तावाडे, पवन कुकुडकर, अनिकेत तावाडे, अमित कुंभारे, अभिनव आंबटकर, चैतन्य मेश्राम, आशय शेरेकर, यांनी परिश्रम घेतले..