
सहसंपादक : रामभाऊ भोयर
यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बँकेचे जवळपास कार्यकाल पूर्ण होणार असून पुढे परत मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूकीची धामधूम सुरू होणार आहे यासाठी ज्या बॅंक प्रतिनिधींच्या मतदानाने बॅंकेचे संचालक निवडले जातात या दृष्टीने प्रत्येक सोसायटीच्या माध्यमातून प्रतिनिधी पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून राळेगाव तालुक्यातील अंतरगाव सावंगी पेरका ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या बॅंक प्रतिनिधींपदी सांवगी पेरका येथील माजी सरपंच तथा सहकार क्षेत्रातील मुरब्बी राजकारणी राजेंद्र ओंकार यांची निवड करण्यात आली असून या निवडी दरम्यान राजेंद्र ओंकार याचे नाव अनिल दांडेकर यांनी सुचविले तर राहुल ढुमणे यांनी नावाला अनुमोदन दिले.त्यावेळी ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष महादेव नेहारे यांच्या सह सर्व संचालक व सचिव उपस्थित होते. राजेंद्र ओंकार यांच्या निवडीमुळे त्यांच्या मित्र परिवारात आनंदी आनंद व्यक्त केला जात आहे.
