दौलतभाई यांच्या वाजवी दरातील चवीने उत्कृष्ट असणाऱ्या खिचडीची पंचक्रोशीत चर्चा


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
यवतमाळ.


पाककला, स्वयंपाक, व पाकशास्त्र यात गेल्या अनादी काळापासून स्त्रियांची मक्तेदारी राहिलेली आहे व ते बऱ्याच प्रमाणात सत्य जरी असले तरी काळानुसार वर्तमान स्थितीत बदल होऊन यात पुरुष सुद्धा मागे नाही विशेष विद्यापीठाने सुद्धा याला कलेचे स्वरूप देऊन अभ्यासक्रम सुद्धा अस्तित्वात आणला तो म्हणजे होम सायन्स च्या स्वरूपात हल्ली आपण बघतोच आहे मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणजेच मॉडर्न आणि आधुनिकतेच्या पद्धतीत सांगावयाचे झाल्यास कुक म्हणून काम करत आहेत.

पण ढाणकी शहरातील असा एक अवलीया असून त्याने कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता रोजच्या आलेल्या अनुभवानी ही कला अवगत केली आहे. त्या अवलियाचे नाव आहे दौलतभाई भाईची खिचडी भजे आणि गुलगुले ढाणकी शहरासह अख्या पंचकोशी प्रसिद्ध असून खिचडीला साथ असलेल्या भज्यामुळे व सोबत असलेल्या कडीमुळे त्याचा स्वाद अधिकच चवदार स्वादिष्ट लागते. ढाणकी किनवट रोड येथे छोटेखानी हॉटेल असून भल्या पहाटेच सर्व काही करण्यासाठी दौला भाई तयारीला लागतात. शहरातील मुख्य चौकात सुद्धा खिचडी, भजे, व इतर सर्व खायला लागणारे जिन्नस मिळतात हे खरं असल तरी शहरात मिळणाऱ्या इतर ठिकाणच्या हॉटेल पेक्षा या ठिकाणी केवळ अर्ध्या किमतीत खिचडी भजी मिळतात ते पण दर्जेदार किनवट रोडवरील शहराच्या थोडे बाहेर जरी असले तरी उत्कृष्ट चव जिन्नसाचे योग्य दर यामुळे अनेक पादचारी वाटसरु आणि दुचाकीहून प्रवास करणारे व गाव खेड्यावर जाऊन आपला व्यवसाय करणारे अनेक जण दौलाभाई भेटून अत्यंत कमी दरात उपलब्ध असलेले दहा रुपयाची खिचडी व दहा रुपयाचे भजे व इतर उपलब्ध असणारे पदार्थाचा आस्वाद घेऊनच पुढे जातात याबाबत सकाळपासूनच भट्टी चालून सुद्धा भाईच्या चेहऱ्यावर थोडासुद्धा थकवा नसतो या बाबीचे रहस्य विचारले असता भाई म्हणाले ग्राहकांचे समाधान झाले की थकवा कसा निघून जातो माहित सुद्धा होत नाही.