
सहसंपादक:- रामभाऊ भोयर

गेल्या अनेक दिवसापासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषन सिंह यांच्या वर असणाऱ्या आरोपांची चौकशी व्हावी यासाठी ऑलिंपिक पदक विजेते कुस्ती खेळाडू हे जंतर मंतर मैदानावर धरणे आंदोलनात होते. ब्रिजभुषण सिंह यांच्यावर आरोप पत्र दाखल करून त्यांची चौकशी व्हावी या मागणी साठी सर्व खेळाडू महिला महापंचायत मध्ये सहभागी होण्यासाठी नवीन बांधलेल्या संसद च्या दिशेने जात होते. या दरम्यान यांच्या वर दिल्ली पोलिसांनी कार्यवाही केली जी बेकायदेशीर होती. देशासाठी ओलंपिक स्पर्धा मध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची ही व्यवस्था आज लोकशाही असणाऱ्या देशात आहे. तर सामान्य माणसाच्या बाबतीत काय घडू शकते याचा विचार न केलेला बरा. या कृतीचा निषेध नोंदविण्या साठी राळेगाव शहरातील लोकशाही वर विश्वास असणाऱ्या संवेदनशील व्यक्ती व खेळाडूंनी पोस्टर च्या माध्यमातून निषेध नोंदवला. क्रांती चौक व क्रीडा संकुल राळेगाव येथे हा निषेध करण्यात आला. यात महेश शेंडे, चंद्रकांत मशरू, प्रतीक बोबडे, ॲड. दीक्षांत खैरे, ॲड. वैभव पंडित, विवेक उंडे, उमेश भडे, गजानन पाल, महेश केवटे, स्वरा पाल, रिद्धी काळे, अक्षय कठाने, लोकेश दिवे
नवोदय क्रीडा मंडळाचे प्रमुख महेश भोयर, प्रफुल खडसे,नरेश दुर्गे, गणेश काळे, महेश राजकोल्हे, शुभम ठाकरे, सोनू खान, मोनू खान, सुरज भगत सुरज उजवने, मिथुन झाडे सचिन डोंगरे, मयुरी चौधरी, रवी भुसनवार व सर्व खेळाडू उपस्थित होते.
