राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)
घाटंजी तालुक्याच्या ठिकाणांहून अगदीं हाकेच्या अंतरावर असलेल्या, खापरी येथील सोसायटीची निवडणूक यावर्षी अविरोध करण्यात आली.निवडणूकीमुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये, गावातील प्रत्येक समाज आपसी गटातटात विभागून नये, राजकीय वैमनस्य वाढू नये , गावात शांतता आणि सलोखा कायम राहील याची काळजी घेत सर्व ग्रामस्थांनी यावर्षीची निवडणूक अविरोध करण्याचा चंग बांधला आणि त्यात यशस्वी सुद्धा झाले.
अविरोध निवडून आलेल्या १३ संचालकामध्ये सर्वश्री राजूभाऊ साठे,मोहन वातिले, गजाननराव वानखडे, नवनीत भोयर, संतोष वाघ,रमेश पांगुळ,तेजस भोयर,रमेश राऊत, राजू वातिले, संजय हेमके, महादेवराव तेलंग, भाग्यश्री भोयर
तानीबाई राऊत यांचा समावेश असून अविरोध निवडीबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केल्या जात आहेत.याचे कारण म्हणजे अविरोध निवडलेले संचालक कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसून इतर कोणत्याही विशिष्ट व्यक्तीच्या नेत्रृत्वाशी काहीही संबंध नाही.
अविरोध निवडीसाठी रामदासजी हेमके, शैलेशभाऊ इंगोले,अनिलराव भोयर,राजूभाऊ साठे,विवेक राव भोयर, शंकरराव काकडे,राहूल भाऊ खांडरे,गजूभाऊ वानखडे,तानबाजी भोयर,देवकुमार शेंडे, संभाजी मामा हेमके,अंकीत भोयर व इतर सर्व मतदारांनी अथक परिश्रम घेतले.
