
(कोरोना काळातील शासन निर्णयाची जिल्हात अंमलबजावणी करा व ऑक्टोबर पासूनचा थकित मोबदला अदा करा मागणी)
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोयर
आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटनेचा मोर्चा शहीदे आझम भगतसिंग , राजगुरू , सुखदेव यांच्या शहीद दिन २३ मार्च रोजी श्रमशक्ती भवन येथुन निघालेला मोर्चा घोषणा देत शहरवासीयांचे लक्ष केंद्रित करत जिल्हा परिषद मार्गे सवीधान चौक , नेताजी मार्केट,दत्त चौक, बसस्थानक चौकातुन आर्णी रोड मार्गे यवतमाळ जिल्हा परिषदेवर धडकला मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड दिवाकर नागपुरे, जिल्हाकार्याध्यक्ष,आयटक यांनी केले आशा स्वयसेवीकांच्या मागण्यांचे निवेदन मा. ना.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई मा. ना. आरोग्य मंत्री, मा.ना.ग्रामीण, विकास मंत्री,मा.ना.नगर विकास मंत्री मुंबई यांना मा.मुख्ख कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यवतमाळ यांचे मार्फत पाठविण्यात आले त्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविकांच्या प्रलंबित मागण्या व शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी व ऑक्टोबर पासूनचा थकित मोबदला अदा करण्यात यावा ह्या मुख्य मागण्या करण्यात आल्या. ग्रामीण व नागरी भागातील आशा स्वयंसेविकांना संदर्भिय शासन निर्णयानुसार कोरोना काळातील प्रोत्साहनपर रू.१०००/- प्रमाणे २२ महीण्याचे रक्कम अदा करण्यात यावी.याबात जि.प.पंचायत विभाग यवतमाळ व जि.प. आरोग्य विभाग यवतमाळ यांनी काढलेल्या पत्रावर गटविकास अधिकारी अंमलबजावणी करीत नसल्यामुळे चौकशी करण्यात येवून शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी संघटना कोरोणा काळा पासून संदर्भिय शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून मागणी करीत आहे. पण यवतमाळ जिल्हा परिषद प्रशासनाने जिआरचा अर्थ एकच वेळा एक हजार रुपये अदा करण्यात यावे असा समजुन आशा स्वंयसेविकांना एक हजार रुपये अदा करण्यात आले आहे.परंतु संदर्भिय जिआरनुसार जिल्ह्यातील गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कर्मचारी व अंगणवाडी सेविकांना २२ महीण्याचे २२ हजार रुपये अदा करण्यात यावे म्हणून अंमलबजावणी केलेली आहे. या बाबत ग्राम पंचायत कर्मचारी यांचे करीता जि.प.पचायत विभागाने काढलेल्या पत्रात रू.१०००/- प्रमाने २२ महीण्याची रक्कम अदा करण्यात यावी असे म्हटले आहे. या बाबत आम्ही पुरावे जोडले आहे. त्याचे अवलोकन करण्यात यावे, आशा स्वंयसेविकाकरीता मात्र २२ महीण्याची रक्कम अदा करण्यात यावी असे पत्रात म्हटले नाही. एकाच जिआरचा अर्थ ग्राम स्तरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्या करीता वेग वेगळा काढल्या जात आहे . त्यामुळे मुळे आशा स्वंयसेविकांचे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने राज्याच्या ग्राम विकास विभागाकडून व नगर विकास विभागाकडून आजवर गाईडलाईन्स मागुन, हा वीषय निकाली काढला नाही. त्यामुळे संघटनेला वारंवार आंदोलने करावी लागत आहे. सदर बाब सहानुभूतीने समजून घ्यावी व कोरोणा भत्याचा विषय निकाली काढण्यात यावा.वरील संदर्भिय शासन निर्णयानुसार कोरोणा काळात एकच महीना रू.१००० /-हजार रुपये देने आहे किंवा. कोरोना काळातील रू.१०००/- महीण्या प्रमाणे २२ महीण्याचे २२ हजार रुपये देने आहे.या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने संभ्रम दूर करण्यासाठी राज्याच्या ग्राम विकास विभागाकडून व नगर विकास विभागाकडून गाईडलाईन्स मागुन हा विषय निकाली काढण्यात यावा अशी आयटक संघटनेने मागणी केली आहे.
तसेच आशा स्वयंसेवकांना ऑक्टोबर महिन्यापासुन मानधन नाही, दोन दोन वर्षे वर्धनी केद्राचे , कुष्ठरोगाचे सर्वेचे, क्षयरोगाचे कामाचे .स्फुटम,पंतप्रधान मातृवंदन योजना या सारख्या कामाचे पैसे मीळत नाही राज्य सरकारचा मोबदला सुध्दा दोन तीन महीण्यापासुन मीळाला नाही त्यामुळे आशा स्वयंसेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेव्हा थक्कीत मानधन तातडीने अदा करण्यात यावे. व इतरही खालील मागण्या सत्वर निकाली काढाव्या , कोविड -१९ च्या अनुषंगाने सर्वेक्षणाचे काम करणाऱ्या आशा स्वंयसेविकांना ग्रामीण व नागरी भागात जोखीम पत्करून कोरोना काळातील काम केले असल्यामुळे त्यांना नियमित वेतन व मानधना व्यतीरिक्त रू.१०००/- इतकी रक्कम २२ महीने अदा करण्यात यावी. वरील संदर्भिय प्ररिपत्रकानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यात यावी , आशा स्वंयसेविकांना दरमहा पाच तारखेपर्यंत केंद्र व राज्य शासनाचे एकत्रित व नियमित मानधन देण्यात यावे , आशा स्वंयसेविकांचे माहे ऑक्टोबर २०२५ पासुन चे थकीत मानधन त्वरीत अदा करा, आशा स्वंयसेविकाना शासनाने मोबाईल फोन, सिमकार्ड, व डाटा पैक दिलेला नाही. आशा स्वंयसेविकांकडे स्वतःचे अत्याधुनीक ॲन्ड्रॉईड 5G मोबाईल फोन नाहीत. तेव्हा जोपर्यंत आशा स्वंयसेविकांना ऑनलाईन कामे करण्यासाठी अत्याधुनीक ॲन्ड्रॉईड 5G मोबाईल फोन, सिम कार्ड व वर्षभर पुरेल एवढा डाटा पॅक दिला जात नाही, तोपर्यंत आशा स्वंयसेविका कोणत्याही प्रकारचे ऑन लाईन कामे करण्याची सक्ती करु नये.अंगणवाडी सेविकांच्या धर्तीवर आशा स्वंयसेविकांना पाच हजार रुपये दिवाळी भेट दिवाळीपुर्वी देण्यात यावी.,आशा स्वयंसेविकांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६५ वर्षे करण्यात यावे.,आशा स्वयंसेविकांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा मागील दोन वर्षाचा मोबदला देण्यात आला नाही. तो देण्यात यावा. व इतरही कामाचा थकित मोबदला अदा करण्यात यावा.,आशा स्वंयसेविका आरोग्य विभागाचा कणा आहेत. त्यांना रात्री-बेरात्री काम करावे लागते. त्यांची नियुक्ती व सेवाशर्तीचे नियम ठरविण्यात आले आहेत. म्हणुन आशा स्वंयसेविकांना शासकीय सेवेत कायम करुन चतुर्थ श्रेणीचे वेतन देण्यात यावे. जोपर्यंत चतुर्थ श्रेणी लागू केली जात नाही, तोपर्यंत आशा स्वंयसेविकांना दरमहा रु. २५०००/- मानधन देण्यात यावे.,आशा स्वंयसेविकांना शासन नियमानुसार भरपगारी प्रसुती रजा देण्यात यावी.,आशा स्वंयसेविकांना आजारपणाची भरपगारी रजा देण्यात यावी.,आशा स्वंयसेविकांना शासनाने ठरवुन दिलेले कर्तव्य व जबाबदाऱ्या व्यतिरिक्त इतर कोणतेही कामे देण्यात येवु नये., विना मोबदला आशा स्वंयसेविकांना कामे सांगण्यात येवु नयेत.,आशा स्वंयसेविकांना मोबदला चिठठी देण्याचे आदेश मा. आयुक्तांचे असतानासुदधा मोबदला चिठठी दिली जात नाही. तेव्हा याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.,आशा स्वंयसेविकांना जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी रुग्ण घेवुन गेल्यास आणि तिथे मुक्काम पडल्यास आशांना मुक्कामासाठी आशा कक्ष स्थापन करण्याच्या मा. आयुक्तांचे आदेश असतानासुदधा याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तरी याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी.,आशा स्वंयसेविकांना अंगणवाडी कर्मचाऱ्याप्रमाणे दरवर्षी किरकोळ २० रजा व सार्वजनिक १२ सुटटया देण्यात याव्यात., नागरी क्षेत्रात कार्यरत आशा स्वंयसेविकांकरीता सेवा शर्तीचे नियम तयार करण्यात यावे.इत्यादी मागण्या करण्यात आल्या यावेळी कॉ.दिवाकर नागपुरे, सुनिता कुंभारे, विजया आत्राम, माया मरस्कोले, सुनिता सोनटक्के, राधा लीखेवार, सारीका येरमे,सविता सीडाम , अल्का राजगडकर, नितीना कुंभरे, अनिता अर्के, रेखा होले, अनिता पींपळे, किरण कांबळ, विजया तायडे,चंदा जयस्वाल, निता मोहळ, लीना निमकर, संध्या कातकिडे, बेबी भारती, रंजना मीटे, मीना गुढे, गंगा घुमे, पुष्पा मसराम, समशाद पठाण, अर्चना कडु, योगीता हेमने, विनिता वाठमोडे , माया इंगोले, इंदु जाधव,वर्षा मोहाळे, ज्योती मुजमुले, राखी पवार, गीता जाधव,शिला भगत, अर्चना माघाडे, चंचल केदार, छाया राठोड, अल्का पैठणकर, शोभा राहुलवाड, सुमन टेकाडे, अर्चना पाईकराव, ज्योती धुळे, अरूणा शींदे, सत्यभामा पवार, अरूणा शिंदे, कांता खरवडे, सुशीला आडे, अंजना मुरकुटे, विजया शेखावत, अनिता सावळे, सुवर्णा चव्हाण, शीला पवार, विश्रांती इंगळे, शुभांगी सुकळकर, शालीनी ढोके, उषा पांडोळे, सीमा जाधव, माया ठमके, शांता हुलगुडे, मीरा चक्रनारायन, कल्पना इंगळे, लता ठाकरे, मंगला बल्की,अंजु तुमराम , शिंदु गुरनुले, वैशाली दानखडे, निता सोयाम, अरूणा आस्वले, सितल येसेकार, ज्योती राऊत, दुर्गा मोहुर्ले , मीना भिमटे, रंजना मेश्राम, छाया खडतकर, दर्शना अहीरे, माया सातपुते, वर्षा चौधरी, मंगला रांखुडे, प्रतिभा ढोकने, रंजना राऊत, रंजना वानखडे, सुनंदा कांबळे, ज्योती तामगाडगे, मीना लुटे, विद्या लेंडे, संगीता सहारे, सविता वाघमारे, कविता कुळमेथे, सुकेशनी हलवले, वंदना सिडाम,
