
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथिल नंदुरकर आश्रम शाळेवर कडक बंदोबस्तात बारावीच्या पेपरला सुरुवात झाली असून येथील १० फेब्रुवारी ला इंग्लिशचा पहिला पेपर तर १२ फेब्रुवारीला मराठीचा दुसरा पेपर बोर्डाच्या बैठे पथकांच्या उपस्थितीत व वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे यांच्या कडक बंदोबस्तात संपन्न झाला आहे. सविस्तर वृत्त असे २५ जानेवारी रोजी नंदुरकर आश्रम शाळेवर पुष्पा टू अजय मोहिते यांचा एक मोठा कार्यक्रम घेऊन परिसरातील विद्यार्थी तसेच पालकांना बोलावून या केंद्रावर कॉफी मुक्त अभियान राबविण्याचा संकल्प संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक यांनी घेतला होता . सदर या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे विनोदी नाट्य सुद्धा करण्यात आले होते. जमके पढाई करेंगा, पर हरगीज, कॉफी नही करेंगा साला, असे वेगवेगळे कलापथक सादर करण्यात आले होते सदर या कार्यक्रमाचे काटेकोरपणे पालन करत ०८०८ या केंद्रावर कडक बंदोबस्तात बारावीच्या पेपरला सुरुवात झाली आहे. सदर राळेगाव तालुक्यातील सावरखेडा हे गाव आदिवासी मतदारसंघात येत असून हे गाव अति दुर्गम भागामध्ये येत असून सुद्धा येथे बऱ्याच काही सोयीसुविधा उपलब्ध आहे. येथे तीन ते चार संस्था आहे तर येथे बारावी सायन्स सुद्धा आहे. तर शेतकऱ्यांसाठी स्टेट बँकेची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. सदर ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी येथे केंद्रासह काही शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगले टक्के घेऊन पास होण्याच्या हेतूने येथे डमी ऍडमिशन घेऊन फक्त पेपरला येत असल्याची काही पालकांकडून सांगितले जात आहे. परंतु येथील संस्था चालकांमध्ये आपशी वाद विवाद निर्माण झाल्याने हा वाद कोर्टापर्यंत गेला असून येथील ०८०८ या केंद्रावर संस्था चालक तसेच मुख्याध्यापक यांनी काफीमुक्त अभियानाचे काटेकोरपणे पालन करून बारावीच्या पेपरला सुरुवात झाल्याने येथील शहरी भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा चांगलाच हिरमुंडा झाला असल्याचा दिसून येत आहे
