शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जयंत कातरकर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष धडकले निवेदन घेऊन बँकेवरती

सहसंपादक : रामभाऊ भोयर

बँक ऑफ इंडिया पोहणा शाखा शेतकऱ्यासह मनसेचे निवेदन आज दिनांक २/७/२०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांनी दिले निवेदन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवेदन देऊन शाखा प्रबंधक अशी एक तास चर्चा सर्व मुद्द्यावर केली त्यात शेतकऱ्यांचे पीक कर्ज केवायसी पिक विमा अतिवृष्टीचे पैसे पीएम किसान चे पैसे केवायसी मुळे बँकेने खाते बंद करण्यात आले अशा परिस्थितीत शेतकरी व ग्रामस्थ हदबळ झाले बँकेने शेतकऱ्यांच्या पेरणीचा खतांचा औषधांचा कुठलाही विचार न करता त्यांना पीक कर्ज घेण्यापासून व इतर योजनांच्या पैशापासून खाते बंद करून वंचित ठेवले पेरणीचा वेळ निघून कालावधी होतंय तरीपण तीन महिन्यापासून लोकांनी केवायसी साठी भरलेले फॉर्म अजूनही किंवा झालेले नाही तसेच पीक कर्जासाठी लागणारे संपूर्ण कागदपत्रे शेतकऱ्यांनी बँकेत देऊन कर्जाचा वाटप होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त होऊन आहे अशा परिस्थितीत शेतकरी व बँकेचे खातेदार शेकडो लोकांनी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर यांच्याकडे धाव घेतली व संपूर्ण परिस्थितीत त्यांना निदर्शनात आणून मनसेच्या झेंड्याखाली बँकेला चेतावणी दिली व प्रबंधकाची भेट घेतली असता कोणा बँकेच्या बाबतीत तीस ते पस्तीस हजार खातेदार असल्याचे कळले त्यात नेमके कर्मचारी असून रोज रोज केवायसी व शेतकऱ्यांना पिकाच्या कर्जाबाबत फार्म गोळा होत असल्याचं कर्मचारी सांगत असते अशा परिस्थितीत बँकेच्या झोनल ऑफिसर त्या ग्रामीण भागातील पोहणा शाखा इथे नेमके कर्मचारी असल्यामुळे हा प्रश्न उद्भवत आहेत त्यात काही शेतकऱ्यांचे सेटलमेंट कर्जाचे करून दोन ते तीन महिन्याचा कालावधी लोटला असून सुद्धा नवीन खाते तयार करून त्यांना कर्ज वाटप होत नाही कारण कर्मचाऱ्यांची कमतरता शेवटी हाच प्रश्न उद्भवत आहे संबंधित बँकेच्या झोनल ऑफिस नी याची दक्षता घेऊन ग्रामीण भागात पोहणा वडणेर या शाखांना लवकरात लवकर जर कर्मचारी पटवून शेतकऱ्यांना कर्जवाटप व त्यांच्या खात्याची केवायसी करावी यासाठी निवेदन देण्यात आले जर बँकेनी लवकरात लवकर व त्या शाखेच्या वरिष्ठांनी सुद्धा यावर लक्ष तर दिले नाही तर मनसेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग घेऊन आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर यांनी दिला व त्यांना खडसावून सांगितले की मनसे स्टाईल आंदोलन केल्या जाईल त्यात कुठलाही विचार केल्या जाणार नाही शेतकऱ्यांना या परिस्थितीतून जर लवकरात लवकर बाहेर जर काढले नाही तर आम्ही बँकेला सोडणार नाही अशा पद्धतीने इशारा देऊन निवेदन देण्यात आले त्यावेळेस उपस्थित जिल्हाध्यक्ष जयंत कातरकर जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ बोंबले तालुका अध्यक्ष पवन तडस सर्कल अध्यक्ष प्रफुल भगत पिपरी सर्कल अध्यक्ष विकी धानोरकर तालुका उपाध्यक्ष सुरज भोसले व वैभव ढगले केसरकर हर्षल चिंचोले नंदू पावडे सोमेश्वर साळवे गजूभाऊ धोटे अनेक कार्यकर्ते व शेतकरी वर्ग उपस्थित होतो.