
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
पोळा रे पोळा बैलाचा पोळा टमाट्याचा भाव पाहून श्रीमंताच्या पोटात आला गोळा सरकारचा फक्त खाजगीकरणावरच डोळा एक गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव , आभाळ गड गड दे शिंग फ़डफडे शिंगात पडले हो खडे,राज्यातील कर्मचारी इकडे पेन्शन साठी रड्डे खासदार आमदार खाते पाच पाच पेन्शनचे पेढे,सीमेवरील जवान पेन्शन विना मरे,
सरकार देते फक्त आश्वासनाचे वडे एक नमन गौरा पार्वती हर बोला हर हर महादेव अशा पोळ्यानिमित्त सोशल मीडियावर झडत्यांची रेलचेल दिसून आली आहे.
पोळा सण हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असून तालुक्यात यावर्षी जुलै महिन्यात दोन वेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अजूनही शासनाने भरपाई दिली नसल्याने पोळा सणानिमित्त झडत्यांमध्ये राजकीय घडामोडीवर शेतकऱ्यांनी जोरदार हल्ला चढवल्याचे गावागावात बघायला मिळाले आहे.
यावर्षी पोळ्याचा सणाचा माहोल वेगळाच होता गावामध्ये राजकीय वातावरण शेतकऱ्यांची व्यथा आपल्या सर्जा राजाला ऐकविण्यात आली या मधूनच राज्यकर्त्यांविषयी शेतकऱ्यांच्या मनामध्ये चीड असल्याचे दिसून आले. मागील काही दिवसापासून गावागावात मराठा आरक्षणाच्या संदर्भात उपोषणे आंदोलन करीत असून चक्क मराठा आरक्षणाकरिता विष प्राशनही केले मात्र शासनाने अद्यापही अरक्षणा विषयी ठोस निर्णय घेतला नाही तसेच मागील काही दिवसात राज्यात काही राजकीय नेत्यांनी ईडीच्या धाकामुळे सत्तांतर करून राजकीय वातावरणात बदल झाला असून त्यातच पोळा सणाला झडत्यांमधून राजकीय घडामोडीवर जोरदार हल्ला चढविण्यात आल्याचे चित्र गावागावात पाहायला मिळाले आहेत.
बैला प्रती कृतज्ञता केली व्यक्त
बैला प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा हा सण वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना एक दिवस विश्रांती देऊन त्याची पूजा केली जाते व त्यांना पुरणपोळीचा निवद भरविला जातो तालुक्यात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच गावागावात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते
