
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियाना अंतर्गत नवरात्र निमित्त सम्मान नारीशक्ति या अभियानात बाभुळगाव , राळेगाव येथील समाजातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मातृ शक्तींचा सन्मान हाच आमचा संकल्प बाभुळगाव येथील सौ.ललिताताई उमेशजी वर्मा, राळेगाव क्षेत्रातील मार्कण्डिय पब्लिक स्कूल प्राचार्या डॉ. सौ.शितल संतोष कोकुलवार,सौ.वंदनाताई शंकरजी खुनकर, सामाजिक कार्यकर्ते सौ.संतोषीताई राजजी वर्मा यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात चिकाटीची कामगिरी करणाऱ्या चि.सुहास उमाटे यांनी स्वखर्चाने खरड्या पासुन भोजाजी महाराजांची हुबेहूब प्रतिकृती मंदीर तयार केले त्यांचा ही सत्कार करण्यात आला.भवाणी माता मंदीराच्या भक्तांनी श्री.दिलीप किसनाजी पावडे यांच्या सौ.अर्चना दिलीपजी पावडे ,चि.आकाशजी भोकरे यांनी मंदीरात चोरीच्या उद्येश्याने आलेल्या चोरांना पोलीसांच्या स्वाधीन केले.एक जागृत नागरिक म्हणुन त्यांच्याही सत्कार करण्यात आला.भवानी माता मंदीराचे अनेक भक्त उपस्थित होते जयप्रकाशजी वर्मा, राजेंद्रजी वर्मा,दिलीपजी वर्मा,अशोक जी वर्मा,राजजी वर्मा ,तसेच वार्ड नं.11चे उमेदवार सौ.ज्योत्स्ना राऊत, सौ.कोपकर ताई,नगर सेवक संतोषजी कोकुलवार त्यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख राळेगाव परिसरातील कौतुकास्पद कामगिरी करणारे पोलीस स्टेशन चे ठाणेदार श्री.रामकृष्ण जाधव सर त्यांच्या सत्कार करण्यात आला.अनुलोम अनुगामी उपविभाग प्रमुख श्री.किरणजी जेवके, राळेगाव भाग जनसेवक सागरजी सोनवने , मर्दानी लाठीकाठी या खेळात अमरावती जिल्हा गोल्ड मेडल चि.मंथन उमेशजी वर्मा, डॉ.कैलाशचंद वर्मा,प्रकाश मेहता, राष्ट्रपाल भोंगारे त्यांच्या देखील सत्कार करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला महीलांनी आवर्जून उपस्थिती लावली ,सौ.प्रमीला वर्मा,सौ.सुरज वर्मा,सौ.संगिता वर्मा,सौ.हेमा वर्मा,सौ.पायल वर्मा,श्रीमती सुनिता उईके,कु.ईषा वर्मा,कु.गौरी वर्मा,सुजल पावडे ,हिमांशु पावडे,धानोरकर, मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होते.
अनुलोम अनुगामी लोकराज्य महाभियानच्या उद्येश आहे समाजात गरजु अपंग लोकांसाठी योजन्या पोहचल्या पाहीजे.कार्यक्रमाचे संचलन आशिशजी कडु आभार सौ.पायल वर्मा ह्यांनी केले.
