ढाणकी येथील बंद केलेले तहसील कार्यालय पूर्ववत चालू करा रोहित वर्मा यांची मागणी

. प्रतिनिधी::प्रवीण जोशी


ढाणकी येथील लोकसंख्या ४०हजाराच्या आसपास असून . ४०ते ५०खेडे या गावासी जोडले गेलेले आहेत.ढाणकी नगरीत सन १९९७ मध्ये प्रशासनाने उमरखेड तह‌सील वरचा भार कमी करत, नागरिकांच्या मागणीचा विचार करुन ढाणकी येथे नायब तह‌सील कार्यालय कार्यान्वित केले होते. ढाणकी शहरातील व गावखेड्यातील नागरिकांचे शासकीय कामे विनाविलंब होत होती. त्यामुळे नागरीक खुश होते. परंतु आचानक पणे ढाणकी येथील नायब तहसील कार्यालय बंद केले गेले. नायब तहसील कार्यालय बंद केल्याने ढाणकी व परिसरातील ४० खेडे गावच्या नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना उमरखेड येथे जावे लागत आहे.उमरखेड तहसील कार्यालयात सर्व तालुक्याचा कामाचा बोजा असल्याने शालेय विद्यार्थ्यांना उमरखेडला अनेक चकरा मारून सुद्धा काम वेळेवर होत नाही. उमरखेडला शालेय कामासाठी गेल्यामुळे शाळेला सुट्टी काढून जावे लागते. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बुडाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर सुद्धा याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना सुद्धा शेतातील कामकाज बुडून उमरखेडला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्याचे व विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होत आहे . पावसाळ्याच्या दिवसात तर, अनेक वेळा लहान मोठ्या नाल्याना पूर येतो.अशा अनेक संकटांना सामोरे जाऊन उमरखेड ला जावे लागते. विद्यार्थी व गाव खेड्यांच्या नागरिकाचा विचार करून त्यांचा त्रास कमी करण्यासाठी शासनाच्या नवीन नियमा प्रमाणे उमरखेड तहसील कार्यालयाचा कामाचा बोजा कमी करून, ढाणकी येथे अप्पर तहसील कार्यालय लवकरात लवकर चालू करण्यात यावे. अन्यथा संविधानिक मार्गाने ढाणकी येथे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनामार्फत उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, तसेच तहसीलदार याना भाजपा युवा मोर्चा पुसद जिल्हा महामंत्री रोहित वर्मा यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय चालू करणे हे शासन स्तरावरचे काम जरी असले तरी ते ढाणकी व बंदी भागाच्या हिताचे अत्यंत महत्त्वपूर्ण काम आहे यासाठी मी स्वतः शासन स्तरावर प्रयत्न करणार आहेच परंतु प्रशासकीय यंत्रणेने सुद्धा याचा पाठपुरावा करावा अशी अपेक्षा आहे.
तसेच ढाणकी येथे पूर्ण वेळ नायब तहसील कार्यालय चालू होईपर्यंत आठवड्यातून दोन दिवस का होईना ढाणकी येथे नायब तहसील कार्यालय चालू करावे


रोहित विष्णुदास वर्मा
महामंत्री भाजयुमो पुसद.
ढाणकी भाजपा शहर उपाध्यक्ष नागेश रातोळे, पप्पू निमल्लवाड, राजू दोंतुलवार, वैभव कोठारी, विनायक अक्कावार, परमेश्वर इंगळे, गणलेश गांजरे आदी उपस्थित होते.