क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात लेप्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना श्रद्धांजली अर्पण


प्रतिनिधी : नितेश ताजणे,वणी


वणी – भारतीय सैन्यात लेप्टनंट कर्नल या पदावर कार्यरत असलेले वासुदेव दामोधर आवारी यांचे दि. ०४/१०/२०२२ रोजी मंगळवार दुपारी ३ वाजताच्या सुमारास चायना बॉर्डरवर कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले. लेप्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना दि. ०७/१०/२०२२ रोजी सायं. ०७:०० वाजता सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय वणी येथे त्यांना श्रद्धांजली देण्यात आली, यावेळी सावित्रीबाई फुले वाचनालयतील पदाधिकारी, सदस्य व कर्मचारी, मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, सदस्य व वाचनालयातील वाचक उपस्थित होते.