
प्रतिनिधी: प्रवीण जोशी
ढाणकी
ढाणकी पासूनच जवळच असलेल्या कृष्णापुर येथील पण सद्यस्थित नांदेड येथे वास्तव्यास असलेले प्रा,आनंद जोशी(कृष्णापुरकर) यांची मुलगी संस्कृती हीने जेईई ही अभियांत्रिकी व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्वाची असते भविष्यात विज्ञान शाखेला अनुसरून विविध वाटचालीसाठी ही परीक्षा घेतली जाते ही परीक्षा मेन 2023 च्या जानेवारी चा निकाल नुकताच नॅशनल टेस्टिंग या संस्थेने जाहीर केला यावेळी निकालात “ॲलन ” करियर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड चे विद्यार्थी उत्कृष्ट गुणानुक्रमे पास होऊन गुणवत्ता यादी चमकलेत व उत्तुंग भरारी घेतली त्यातील एक म्हणजेच विदर्भ एक्सप्रेस अशी जीची ओळख असलेली संस्कृती जोशी (कृष्णापुरकर) हिने या परीक्षेमध्ये ९९:३० जेईई अत्यंत खडतर् बुद्धीचा कस लागत असलेल्या परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण मिळवले असून या परीक्षेमध्ये खूप कमी विद्यार्थी पास होतात व या यशामुळे अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले ही परीक्षा अत्यंत कठीण असून यात गुण प्राप्त करणे अशक्यप्राय असते पण संस्कृतीने परीक्षा अगदी सहजपणे आणि दर्जेदार गुण प्राप्त करून आपले बुद्धीची चुणूक दाखवली विशेष म्हणजे या वेळीच उत्कृष्ट गुण मिळवले असे नाही तर अगदी पहिली ते दहावी पर्यंत सुद्धा कौतुकास्पद कामगिरी केली आहे म्हणून तिच्याकडून सगळ्यांना या परीक्षेमध्ये सुद्धा घवघवीत यश मिळेल अशी अपेक्षा होती आणि तिने सुद्धा अपेक्षेनुसारच कामगिरी केली यावेळी प्रा, आनंद म्हणाले की माझ्या मुलीने जे काही यशस्वी कामगिरी केली याचे श्रेय माझ्या पत्नीला जाते. मी तर दिवसभर कामातच व्यस्त असतो तर संस्कृती आपल्या यशाचे श्रेय दिवंगत आजोबा प्रा डॉ, बा दा जोशी, आजी प्रा डॉ वसुधा जोशी ,आई हर्षदा जोशी (कृष्णापुरकर) व वडील प्रा, आनंद कृष्णापुरकर, काका प्रसाद जोशी व काकू स्नेहल जोशी यांना देते
