
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दहेगाव येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्यात. भगतसिंग, राजगुरू, महात्मा गांधी, झाशीची राणी लक्ष्मीबाई, मिल्ट्री जवान, शेतकरी, पंडीत चाचा नेहरू इत्यादी वेशभूषा सादर करण्यात आल्या. मुलींनी पारंपारिक पद्धतीने नववारी नेसून अमृत कलशामध्ये गावकऱ्यांकडून माती जमा करण्यात आली. गावातील प्रतिष्ठित मंडळी, माजी सरपंच शेषराव ताजणे ग्रामपंचायत सदस्य रविंद्र मडावी, ग्रामविकास अधिकारी ए, एस गाणार, संगणक चालक हर्षल शेंबडे, लिपिक, सतिश पेंदे, अंगणवाडी सेविका, पुजा गायकवाड, दुर्गा जोगी, मदतनीस, शशीकला खामणकर, भारती रोकडे यांनी सहभाग घेतला. गावातून वाजत गाजत प्रभातफेरी काढण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर देऊळकर, शिक्षक,आर ,आर ताठे, चिंतामण धाडवे, डोफे मॅडम, धुळे मॅडम, यांनी रॅली सजावटीसाठी आकर्षक असे कलश तयार केले.तसेच सर्व गावकऱ्यांनी सहभाग घेतला
