शेतकऱ्यांना मार्गदर्शनाकरिता मजरा(रै) येथे कृषीकन्यांचे आगमन

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व आधुनिक शेती पद्धतीची माहिती मिळावी व त्यातून त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी सधन | व्हाया पाकरिता नवनवीन आधुनिक प्रयोगात्मक माहिती देण्यासाठी महारोगी सेवा समिती द्वारा संचलित डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोलाशी संलग्नित आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत मजरा (रै) येथे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी (कृषीकन्या) मजरा(रै) येथे आगमन झाले.
यावेळी गावाचे सरपंच राकेश बोधे, ग्रामसेवक डेंगळे, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी यांनी या कृषीकन्यांचे स्वागत केले.
अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती व त्यातून होणान्या नापिकीमुळे आर्थिक विवंचनेत जगणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीविषयक पुरेसे व योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. बी. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
शेतकन्यांना मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमामध्ये मजरा (रै) येथे आगमन झालेल्या कृषीकन्यांमध्ये प्रिती सरकार, पायल पिसे, देवश्री राठोड, जुही सोनुले , सेजल सोमकुंवर, आकांक्षा रहांगडाले. इत्यादी कृषीकन्यांचा समावेश होता. यावेळी गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.