
सहसंपादक : रामभाऊ भोयर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई चे वतीने 12 जाने.ला आयोजित राजमाता जिजाऊ साहेब भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने टिळक भवन दादर मुंबई येथे पार पडलेल्या विविध विभाग व सेल मध्ये कर्तबगार उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा प्रसंगी वैशाली ताई (पेंद्राम) कोराम यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला अध्यक्ष संध्या ताई सव्वालाखे, परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अमितभाऊ मेश्राम, प्रदेश काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच परिवहन विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदी निवड करण्यात आली.
