
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्यातील रिधोरा येथील शेतकरी महिला बेबीबाई सुभाष सोनुले यांचा मुलगा पांडुरंग सुभाष सोनुले वय ३५ वर्ष यांनी १२ ऑक्टोंबर रोजी वीष प्राशन केले होते त्यांना वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते सदर त्यांचा उपचारादरम्यान २४ ऑक्टोंबर रोजी मृत्यू झाला आहे. सदर पांडुरंग सोनुले हा आईच्या नावे असलेली विहीरगाव शेत शिवारात ३ एकर ५ आर शेती वाहत असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले आहे.व त्यांच्या शेतीवर बँकेचे कर्ज व मृतक पांडुरंग सोनुले यांच्यावर खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्ज ही असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. तर सततच्या ना पीकी मुळे या युवा शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर असल्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. सदर त्यांच्या पश्चात पत्नी रूपाली सोनुले व एक मुलगी कु. पलक वय ४ वर्ष एक मुलगा वय २ वर्ष व आई सौ. बेबीबाई सोनुले व वडील सुभाष सोनुले व भाऊ जगदीश सोनुले असा आप्त परिवार असुन त्यांच्या निधनाने रिधोरा सह परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे
