पिंपरी मेघे वर्धा येथे पाण्याची टंचाई ,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष


सविस्तर वृत्त
गेल्या काही दिवसापासून पिंपरी मेघे वर्धा यातले काही वार्ड मधल्या लोकांना ग्रामपंचायतचा मनमानी कारभार असल्याचा नागरिकांना भोवत आहे
पावसाळ्याचे दिवस असून सुद्धा ग्रामपंचायत पिंपरी मेघे येथे वार्ड मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई दिसून येत आहे या दिवसात सुद्धा ग्रामपंचायत वॉर्ड मधल्या नागरिकांना पाणीपुरवठा करत नसेल. तर उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल असा गंभीरता प्रश्न नागरिकांच्या मनात पडला आहे त्यामुळे इथल्या नागरिकांनी ग्रामपंचायत मधल्या सरपंच साहेबांशी संपर्क साधून वार्ड मध्ये पिण्याच्या पाण्याची तळमळ होत आहे ही परिस्थिती सांगत असताना सरपंच साहेबांनी नागरिकांना उत्तर दिले की वाड मध्ये नळ कनेक्शन चा पुरवठा जास्त करण्यात आला त्यामुळे पाण्याची टंचाई हे कायम राहणार असे स्पष्ट मत सरपंच साहेबांनी नागरिकांसमोर व्यक्त केले त्यामुळे इथल्या नागरिकांनी सरपंच साहेब आला प्रश्न मांडला ही परिस्थिती येणार होती तर तर ग्रामपंचायत ने नळ कनेक्शन जास्त वाटप का केले त्यामुळे आम्हावर एक दिवस आले हे आता तुमच्या लक्षात आले वाढ मधल्या सर्व नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे. असा इशारा वार्ड मधल्या सर्व नागरिकांनी ग्रामपंचायतला जाब दिला वॉर्ड मधल्या नळाच्या पाण्याची व्यवस्था करा अन्यथा वाड मधील सर्व नागरिक ग्रामपंचायत वर मोर्चा आणू असा इशारा दिला.