रुग्णांना फळ वाटप करून बाळशास्त्री जांभेकरांची जयंती साजरी

सहसंपादक : रामभाऊ भोयर

पहिले मराठी दर्पण या वृत्तपत्राचे पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधून दिं ६ जानेवारी २०२४ रोज शनिवारला विश्राम गृह येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बाळशास्त्री जांभेकर यांच्या विषयी पत्रकारांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर शासकीय ग्रामीण रुग्णालयात जावून रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आहे.
यावेळी संघटनेचे सचिव राष्ट्रपाल भोंगाडे, उपाध्यक्ष मनोहर बोभाटे, कोषाध्यक्ष सचिन राडे, जेष्ठ पत्रकार प्रकाश मेहता, प्रा. अशोक पिंपरे, फिरोज लाखाणी, मंगेश राऊत, महेश भोयर, विशाल मासुरकर, शालीक पाल, राजू काळे, गुड्डू मेहता, संजय दुरबुडे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.