मार्कंडेय पोदार लर्न स्कूल वणी मध्ये पालक शिक्षक समिती सभा संपन्न

शैक्षणिक वर्ष 2023-2024 मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी ची पालक शिक्षक समिती ची सभा संपन्न झाली त्यात मान, रमेशजी व्ही.सुंकुरवार, अध्यक्ष श्री मार्कण्डेय शिक्षण संस्था वणी, मा, राहुल आर, सुंकुरवार सचिव श्री मार्कण्डेय पोदार लर्न स्कूल वणी तसेच शाळेचे मुख्याध्यापक मान, आमिन नुरानी सर,AO गुडिया पाठक मॅम व पालक वृंद उपस्थित होते,सभेत शिक्षक पालक समिती चे अध्यक्ष मा, आमिन नुराणी, उपाध्यक्ष
सौ स्नेहा मत्ते सचिव म्हणून शिक्षक प्रतिनिधी सौ,शुभांगी देशमुख, सहसचिव सौ माया त्रिवेदी, पालक प्रतिनिधी श्री संतोष जोशी, श्री, सचिन नावडे सौ प्राची रासेकर, सौ सविता माहला , डॉ, उझमा शाह, सौ, माधुरी बनसोड व इतर पालकवृंद हजर होते,या मध्ये पालक व शिक्षक यामंध्ये समन्वय साधन्याकरीता व विध्यार्थी यांचा अभ्यासिक व त्यातील सुप्त कला गुणांना वाव मिळावा व्यासपिठावर कलागुणांचे प्रदर्शन करावे. त्तसेच इंग्रजी भाषेत बोलता यावे यासाठी प्रत्येक दिवसी त्यांचेकडून गृहपाठ करून घेण्यात येईल, आपली स्वतःची सुरक्षा कशी करावी, या सर्व विषयांवर रितसर चर्चा झाली, मुलाचा सर्वांगीण ,शैक्षणिक विकास साध्य करता येईल यावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल, वाचाल तर वाचाल या तत्वावर शाळेत बुक बँक , वाचनालय तयार करण्यात आले आहे, पालकांकडून सहकार्य मिळत राहावं तथा विध्यार्थी यांच्या शैक्षणिक अडचणी विषयी समाधान करण्यात येईल अशी माहिती मुख्याद्यापक यांनी दिली. सभेच्या यशस्वितेकरीता शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले,