श्री स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त भव्य दौड स्पर्धा आणि रक्तदान शिबिराचे आयोजन

सहसंपादक : रामभाऊ भोयर

राळेगाव येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती निमित्त श्री स्वामी विवेकानंद विचार मंच वतीने भव्य दौड स्पर्धा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी सकाळी 7 वाजता क्रांती चौक, राळेगाव येथून दौड स्पर्धांना सुरुवात होणार आहे. स्पर्धेचा मार्ग क्रांती चौक, बस स्टँड, शिवतीर्थ, मेटीखेडा रोड आणि पुन्हा क्रांती चौक असा निश्चित करण्यात आला आहे.

तसेच, दिनांक 12 जानेवारी 2025 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ग्रामीण विकास प्रकल्प, माता नगर, राळेगाव येथे होणार आहे. स्वामी विवेकानंद विचार मंच, राळेगाव यांनी तालुक्यातील सर्व रक्तदात्यांना या शिबिराला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. ॲड.प्रफुल सिंह चौहान संचालक, यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, राळेगाव यांच्या हस्ते होणार आहे. आयोजकांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.