आंघोळीला गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू, वडकी येथील घटना

नदीवर आंघोळीला गेलेल्या तरुणाचा गावालगत असलेल्या नाल्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दि 25 जुलै रोजी सकाळच्या दरम्यान उघडकीस आली.
राळेगाव तालुक्यातील वडकी येथे राहत असलेला सद्दाम वय 40 वर्ष हा वडकी गावाजवळ लागून असलेल्या नाल्यावर सकाळी आंघोळीला गेला असता नाल्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली.सद्दाम याच्या आई वडीलाचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते,त्याच्या पाठीमागे एक बहीण तिचे पण लग्न झाले होते.सद्दाम हा एकटा असल्याने वडकी गावात मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होता.व कुठेही आडोसा भेटला की आपली रात्र काढत होता,नेहमीप्रमाणे तो सकाळी गावालगत असलेल्या नाल्यावर आंघोळीला गेला मात्र आज सकाळी आंघोळी दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला.घटनेची माहिती मुस्लिम समाज बांधवांना मिळताच त्याच्या मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.