पेसा क्षेत्रात आदिवासी उमेदवारांची पद भरती करा आदिवासी सेवक किरण कुमरे यांची मागणी, [पेसातील पात्रताधारकांचे बेमुदत उपोषण]

सहसंपादक : रामभाऊ भोयर

चुकीचा अर्थ काढून राज्य शासनाने अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांची संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे राज्यातील १३ जिल्ह्यांमधील आदिवासी उमेदवारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेवरील ही स्थगिती उठवून १७ संवर्गातील आदिवासी उमेदवारांची पद भरती करण्याची मागणी ….. यांच्याकडे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण कुमरे यांनी केली आहे. यावेळी भेट देऊन असलेले न्याय मागणी समाजाला मिळून देण्याचा पूर्ण प्रयत्न करील असे सांगितले. सरकारने योग्य मार्ग काढावा जवळपास १४ वर्षांपासून पेसा क्षेत्रातील भरती झाली नाही. तत्कालीन आदिवासी मंत्री, आमदार यांचे दुर्लक्ष झाले. सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आहे. निर्णयास बराच कालावधी लागू शकतो. बहुतांश आदिवासी उमेदवारांची वयोमर्यादा संपत आहे. सरकारने योग्य मार्ग काढून पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवारांच्या पद भरतीची मागणी किरण कुमरे यांनी केली आहे.