
जि.प.खेडकर सभागृहात सत्कार कार्यक्रम संपन्न
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य
तालुका प्रतिनिधी/ ७ सप्टेंबर
काटोल – जिल्हा परिषद, नागपूर तर्फे शिक्षक दिनाचे औचित्य साधून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा खेडकर सभागृह , नागपूर येथे काटोल तालुक्यातुन शेषराव टाकळखेडे (वलनी) तर नरखेड तालुक्यातून उत्तम मनकवडे (सावरगांव) यांचा मानपत्र, सन्मानचिन्ह, रोख रक्कम, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प.अध्यक्षा रश्मीताई बर्वे , शिक्षण सभापती भारती पाटील, जि.प.सदस्य समीर उमप ,अति.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कमलकिशोर फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
शेषराव टाकळखेडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहे.तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असून सर्वांच्या मदतीला धावून जातात.शिक्षक संघटनेचे पदाधिकारी म्हणून शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून प्रश्न सोडवून घेतात.
उत्तम मनकवडे यांचे शैक्षणिक करण्यासोबतच धार्मिक उपक्रमात हिरीरीने भाग घेतात.तसेच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना सहभागी करून त्यांच्या सुप्त कलागुणांचा विकास करतात.
दोघांनाही जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दिनेश धवड व विशालसिंग गौर, शिक्षण विस्तार अधिकारी संतोष सोनटक्के, अशोक जांभुळकर, शिक्षण विस्तार अधिकारी नरेश भोयर, सहा.जिल्हा कार्यक्रम अधिकारी, प्रमोद वानखेडे,दिलीप वरोकर विजय धवड, मुरलीधर सातपुते, विवेक बोरकर, विरेंद्र वाघमारे, रमेश गाढवे, विलास काळमेघ, रामभाऊ धर्मे, श्रीकृष्ण भोयर, सुनिल ठाकरे, शिवाजी गौरखेडे, रुपेश राठोड, नरेंद्र मडके, नरेंद्र बोढाळे, दिलीप चांदूरकर, लोकेश सुर्यवंशी, भूषण आगे, एकनाथ खजुरीया, मारोती मुरके, संजय वंजारी, प्रमोद शिंगणापूरे, निलेश शहाकार आदींनी अभिनंदन केले आहे.
