
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव:- तालुक्यातील चिखली (व) ते सरई रस्त्याची सध्याची स्थिती अत्यंत खराब आहे आणि रोडच्या कडेला असलेल्या मोठमोठी झाडे ही रोडवर आली आहे त्यात वळण रस्त्यावर झाडानी पूर्ण मोड झाकली आहेत, रस्त्यावर खड्डे पडले असून, डागडुजी नसल्यामुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रोज शाळेच्या बस,दुधाची गाडी इत्यादी गाड्यांचा आद्र असल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे,चिखली ते सरई रस्त्याची सध्याची स्थिती खूपच वाईट आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे.रस्त्याची दुरुस्ती करण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरुन प्रवास करणे नागरिकांसाठी त्रासदायक झाले आहे. विशेषतः पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यांमध्ये पाणी भरल्यामुळे वाहनचालकांना खड्याचा अंदाज येत नसून गाडी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे,चिखली ते सरई रस्त्याची दुरावस्था झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.तातडीने प्रशासनाने लक्ष वेधून दुरुस्तीची मागणी चिखली (व) आणि सरई येथील स्थानिक नागरिकांनी केली आहे तसेच वाहनचालकांनी सुद्धा रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करत आहेत.
