वसंतसहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचाऱ्यांचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड, (ग्रामीण )
मो.7875525877

उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड यांचे पटांगणात वसंत सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी यांचे उपोषण दिनांक 18 12 2023 पासून माननीय उच्च न्यायालयाचे 30 8 2012 च्या आदेशानुसार निवृत्त कामगारांची ग्रॅज्युएटी अधिक व्याज भंगार विक्रीतून येणारी रक्कम कामगार न्यायालयात जमा करावी. भंगार मालिकेची संपूर्ण रक्कम कोर्ट केसेस मधील 181 निवृत्त कामगारालाच मिळावी व इतर मागण्या साठी वसंत सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कर्मचारी श्री खंडाळे श्री राणे व त्यांचे सवंगडी आमरण उपोषणास बसले असून. वसंत चे कामगारांनी युनियनचे नेते मुडे तात्या श्री पतंगराव साहेबांनी व समस्त कर्मचारी बांधवांनी वसंत सहकारी साखर कारखाना चालू. होण्याकरिता विभागाचे आमदार नामदेवराव ससाने यांचे निवासस्थानी बैठकीला उपस्थित राहून माजी आमदार विजयराव खडसे काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री तातू भाऊ देशमुख भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा तालुक्यातील इतर नेत्यासोबत बैठकीस उपस्थित राहून सर्व काही सहकार्य केले त्या बैठकीमध्ये कारखान्याचेअवसायक व सर्व नेते मंडळी सोबत चर्चा होऊन कारखान्यातील भंगार विक्री करून. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम देण्यात येईल असा शब्द दिला त्या शब्दाला न जागता साखर आयुक्त व अवसायक कर्मचाऱ्यासोबत अन्याय करीत असल्यामुळे यां. अन्याय विरुद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांनी उतार वयात उपोषणास बसावे लागले हे तालुक्यातील बैठकीसाठी उपस्थित असलेल्या नेत्यांसाठी शरमेची बाब आहे. तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व नेत्यांना नम्र निवेदन आहे ह्या प्रकरणांमध्ये आपण जातीनि लक्ष देऊन निवृत्त कर्मचाऱ्यांना जो या वयात त्रास होत आहे. त्यापासून त्यांचे मुक्तता करावी त्याच्या न्याय मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडवाव्यात असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन करण्यात येते आहे.
आज दिनांक 21/12/ 2023 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख एडवोकेट बळीराम मुटकुळे उपजिल्हा संघटक राजेश खामणेकर तालुका प्रमुख सतीश नाईक व्यापारी जिल्हा प्रमुख प्रशांत पत्तेवार शहर प्रमुख गजानन ठाकरे माजी शहरप्रमुख डॉक्टर अजय नरवाडे नगरपरिषचे माजी उपाध्यक्ष अरविंद भोयर इत्यादी पदाधिकाऱ्यांनी उपोषण मंडपात भेट देऊन आम्ही तुमच्या सोबत आहोत शिवसेनेचा पाठिंबा जाहीर केला याप्रसंगी वसंत चे निवृत्त कर्मचारी मोठ्या प्रमाणातउपस्थित होते.