धबधबा नदी नाल्यापासून सुरक्षित अंतर ठेवूनच राहायला हवे……!


प्रतिनिधी:: ढाणकी
प्रवीण जोशी


सध्या देशासह राज्यात सर्वत्र मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्या अभावी बंद पडलेले धबधबे पुन्हा आपले सुंदर मोहक रूप दाखवत आहे पण काही ठिकाणी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या सुद्धा अधिक आहे व ही बाब नक्कीच चिंताजनक आहे त्यात अल्पवयीन तर कोणी तरुण आहेत हे बळी म्हणजे स्वतःहून स्वतः केलेली अनास्था किंवा दुर्लक्ष म्हणायचे का?? पाण्याचा अंदाज माहित नसताना नको तेवढा व अती आत्मविश्वास आणि धाडस दाखविल्यास धोका संभवतो यातूनच जन्माला येते ते अनर्थ नेहमीच पोलीस किंवा स्थानिक प्रशासन यांच्यामार्फत आलेल्या सूचनाकडे कानाडोळा करून पाण्यात उतरण्याचे धाडस कसे होते असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो. सध्या निसर्ग राजा मनसोक्त कोसळत असताना नदी, नाले, धबधबे, धरणे, दुथडी भरून वाहू लागले या पाण्याचे भुरळ लहान मुलांना तरुणांना पडणे साहजिकच आहे पण आश्चर्य या बाबीचे आहे की ते म्हणजे किशोरवयीन मुले धरणाच्या किंवा खोलवर पडत असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी पोहायला उतरतात काही दिवसापूर्वी एक बातमी वर्तमानपत्रात वाचाली ती अशी की मालाडच्या समुद्रात १४ ते १८ वयाची पाच मुले पोहायला गेली व त्यात तिघांचा दुर्दैवी अंत झाला तसे बघता ही सर्व मुले सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातीलच या मुलांना कितीही समजावून किंवा धोक्याच्या ठिकाणी जाऊ नका असे सांगितल्यानंतर सुद्धा ते ऐकत नाहीत व पालकांना कायम लक्ष ठेवता येणे शक्य नाही कधी कधी पालकही मुलाबाबत बेफिकीर असतात याचा चुकीचा फायदा घेत मुले ओसंडून वाहणाऱ्या वाहत्या पाण्यात पोहण्याचे धाडस करतात हे काही ठिकाणी बघायला मिळत आहे पावसाळ्यात नदी नाल्याचे रुद्र रूप असते अशावेळी सर्वच वयोगटातील व्यक्तींनी पोहायला जाण्याची हिंमत कशी होते हा एक चक्राहून टाकणारा विचित्र व तितकाच गंभीर प्रश्न आहे स्थानिकांच्या सूचनाकडे पर्यटक ऐकून न ऐकल्यासारखे करतात आणि त्यातूनच दुर्दैवी घटना घडतात असे कितीतरी वेळा अनेक ठिकाणी बघायला मिळाले पावसाळा ऋतूमध्ये सुट्टीच्या दिवशी धरणावर धबधब्याच्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात येऊन मोजमजा करणाऱ्या पर्यटकांची संख्या भरपूर आहे पण यात पर्यटकाचा अति बिनधास्त पणा थेट कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देत असल्याने अशावेळी कठोरातील कठोर निर्बंध आणून व पुरेपूर सावधगिरी बाळगूनच व खबरदारी घेऊन पर्यटकांना सुरक्षित प्रेक्षणीय स्थळे निर्माण करून त्यांना आनंद घेऊ द्यावा दुर्घटना घडल्यानंतर बचाव पथके पोहोचते पण त्यांना काही तांत्रिक अडचणी सुद्धा येऊ शकतात त्यामुळे त्यांना कधी कधी उशीर झालेला असतो अशावेळी स्थानिकांना भौगोलिक परिस्थितीचा व तेथील जागेचा पुरेपूर अभ्यास असल्याकारणाने स्थानिकच दातडाची मदत करू शकतात त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर मर्यादित भागाची जबाबदारी देता येईल का हे सुद्धा करून पाहायला पाहिजे जेणेकरून पर्यटकांच्या वाढत्या वर्दळीमुळे स्थानिकांना काही काळापुरता रोजगार मिळेल आणि छोटेखानी व्यवसायाला चालना मिळेल व यातूनच त्यांना काही रक्कम मिळण्याचे साधन उपलब्ध होऊ शकते ज्या ठिकाणी शासनाने न जाण्याची निर्बंध घातले आहे अशा ठिकाणी प्रचंड पर्यटकांची गर्दी दिसत आहे सध्या समुद्र धरणे धबधबे या ठिकाणच्या सुरक्षेचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कुणीही अनास्था चूक व बेसावधपणा पर्यटनाला अडचण ठरणार नाही याची काळजी तर सगळ्यांना घ्यावी लागेल