मुलीची आत्महत्या नसून तिचा खून झाला आहे ; आईची पोलिसांकडे कारवाईची मागणी

प्रतिनिधी:रजत रोहनकर,चामोर्शी

येनापुर – गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील येणापूर येथील दीक्षा बांबोळे वय वर्ष 21 या तरुणीचा दिनांक 21 जुलै रोजी तिच्या राहत्या घरीच तिचा गळा दाबून खून करण्यात आला अशा प्रकारचा संशय तिच्या आई द्वारे व्यक्त केला जात आहे. मृतक दीक्षा बांबोळे ही विनोद जक्कुलवार या तरुणाकडे त्याच्या फोटो स्टुडीओत व सेतू केंद्रात नेहमीच जात असल्याने लग्नाचे आमिश दाखवले.त्यामुळे या दोघांचे हळूहळू प्रेमसंबंध जुळून आले.या प्रेम संबंधातूनच तिला गर्भधारणा सुद्धा झाली मृतक दीक्षा बांबोळे या तरुणींने गर्भधारणा झाल्याचे वारंवार सांगून सुद्धा मारेकरी विनोद जक्कुलवार यांनी लग्नास नकार दिला व तिच्या सोबत लग्न न करता तिचा गर्भपात सुद्धा केला.

दिनांक 21 जुलै रोजी दीक्षा ही एकटीच घरी असल्याचा फायदा घेऊन मारेकरी विनोद जक्कुलवार यांनी तिच्या घरी जाऊन तिला मारहाण सुद्धा केली नंतर तिचा गडा दाबून तिचा खून सुद्धा केला सदर खून हा जातीय तिरस्कारातून व सतत लैंगिक शोषणातूनच झाला. अशा प्रकारचा संशय व्यक्त केला जात आहे.

मुलीला न्याय मिळवुन देण्यासाठी भिम आर्मी चे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. जितेंद्र डोहने, शेडुलकास्ट फेडरेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष विनय बाम्बोडे, जिल्हा अध्यक्ष मेश्राम, पोलीस पाटील मारकबोडी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते अनुप मेश्राम, रामटेके सर येणापूर यांनी मृतक मुलीच्या घरी जाऊन भेट देऊन सदर प्रकरणाला वाचा फोडली. गुन्हेगारास अटक न केल्यास आंदोलन करण्याचा संकल्प सेडुलकास्ट फेड्रेसशनने सुद्धा केला .