
तालुका प्रतिनिधी, झरी:-नितेश ताजणे
तालुक्यातील टेंभी येथील गिट्टी क्रेशर प्लांट पीडित महिलेने बंद पडला आहे. टेंभी येथील महिला शेतकऱ्याच्या शेतात ईगल इंडिया कंपनीने डांबर व प्लांट उभारून गिट्टी मुरूम व मातीचे उत्तखनन मोठ्या प्रमाणात सुरू केले आहे. त्यामुळे महिला शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
दीड वर्षापूर्वी शेतकरी महिलेच्या मृतक पतीकडून कंपनीने प्रतिज्ञा पत्रावर चारचाकी वाहन व जेसीबी ठेवण्याकरिता दोन वर्षाकरिता ५ एकर शेत प्रतिज्ञापत्रावर लिहून घेतले. गरीब अज्ञानी आदिवासी शेतकऱ्याच्या शेतीचा वापर चारचाकी वाहन व जेसीबी ठेवण्याकरिता न वापरता त्या जागेवर गिट्टी क्रेशर उभारून जमिनीतून अवैधरित्या ब्लास्टिंग करून गिट्टी मुरूम व मातीचे उत्खनन करून शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. गरीब आदिवासी शेतकऱ्याच्या अज्ञानाचा फायदा उचलून सदर कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली.
याबाबत ची माहिती मिळताच सदर महिला शेतकरी ही आदिवासी समाजातील पुढाऱ्याला भेटून माहिती दिली. पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने पाटण येथे बैठक झाली व बैठकीत शेतीचे नुकसानं भरपाई देण्याची मागणी कंपणीच्या अधिकारी कडे करण्यात आली. काही दिवस लोटूनही कंपनीकडून कोणतेही नुकसान भरपाई बाबत हालचाल दिसत नसल्याने अखेर संतप्त महिलेने स्वतःच्या शेतातील गिट्टी,मुरूम व माती नेण्यास मज्जाव केला. तरीसुद्धा कंपनीने आठवडा लोटूनही नुकसान भरपाई देण्याच्या मानसिकतेत नसल्याचे पाहून अखेर आदिवासी महिला शेतकऱ्यांनाइ शेताती अवैधरित्या सुरू असलेले गिट्टी क्रेशर बंद पडले व तेथील गिट्टी मुरूम व मातीची वाहतूक बंद पाडली. अश्या मुजोर व शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणाऱ्या कंपनीला धडा शिकविणे आवश्यक असल्याचे मत मांडून आदिवासी समाज एकत्र येऊन न्याय मागणार आहे. जोपर्यंत शेतीचे नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत प्लांट वाहतूक सूरु होणार देणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
