अखेर ‘त्या’ महिलेने सोडला अखेरचा श्वास,बजाज फायनान्सच्या विरोधात शिवसेना, युवासेना आक्रमक

शिवसेना पदाधिकाऱ्यांची वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

महिलेवर सेवाग्रामच्या अतिदक्षता विभागात सुरु होते उपचार

तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225)

वर्धा बजाज फायनान्सच्या अक्षय भागवत नामक अधिकाऱ्याने कर्ज नसताना ही महिलेला कर्ज भरण्याचा तगादा लावल्याने अखेर महिलेने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार प्रजासत्ताक दिनी घडला होता. आज त्या महिलेने सेवाग्रामच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या अतिदक्षता आज अखेरचा श्वास सोडल्याने वर्ध्यात खळबळ निर्माण झाली आहे. बजाज फायनान्सच्या कृत्याचे तीव्र पडसाद उमाटण्याची लक्षणे दिसू लागली आहे.
छाया राजेंद्र श्रीवास रा. ठाकरे मार्केट वर्धा, असे महिलेचे नाव आहे. छाया श्रीवास यांनी बजाज फायनान्सचे बचत गटाच्या माध्यमातून कोणतेही कर्ज घेतले नव्हते. तरीही अक्षय भागवत हे बजाज फायनान्स अधीकारी असल्याचे सांगून कर्जाची रक्कम भरण्याचा तगादा लावायचे. अखेर प्रजासत्ताक दिनीच दुपारी घरीच विषारी द्रव्य प्राशन केले होते. महिला अत्यवस्थ असल्याने सेवाग्रामच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत होती. आज पहाटे त्यांची प्राणजोत मावळली.
बजाज फायनान्सच्या जाचाला कंटाळून महिलेने विष प्राशन केले. बजाज फायनान्सच्या अधिकाऱ्यावर आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना युवासेनेचे जिल्हा अधिकारी अभिनंदन मुनोत, सूर्या हिरेखन, मयूर जोशी, श्रीकांत चिमुरकर, राहुल पाटणकर,आशिष मोहोड, शार्दूल वांदिले, कुणाल मोरे, भगवान सहारे, निखिल वाघ, प्रसन्ना कान्नाव, संदीप हिवरे, कमल जाधव यांनी केली आहे
.

शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि शिवरत्न जिवा शिवा संघटनेची वर्धा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा

बजाज फायनान्सचे कोणतेही कर्ज नसताना फोनद्वारे धमकी दिली. या धमकीला घाबरून छाया श्रीवास यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यामुळे छाया श्रीवास यांच्या मृत्यला बजाज फायनान्सचे वसुली अधिकारी अक्षय भागवत आणि विभागीय व्यवस्थापक शंकर शेळके हेच कारणीभूत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीला घेऊन वर्धा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. जर 24 तासांच्या आत गुन्हा दाखल करून छाया श्रीवास यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अन्यथा शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तीव्र आंदोलन करतील, असा इशारा शिवसेना वर्धा माजी जिल्हाप्रमुख राजेश सराफ, युवासेना जिल्हाधिकारी सूर्या हिरेखन, अभिनंदन मुनोत, अवंतिका शेंडे, भारती कोटंमकर, प्रमोद पांडे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी दिला.

छाया राजेंद्र श्रीवास यांच्यावर आज दुपारी 5 वाजता वर्धेच्या मोक्षधामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, एक मुलगी आणि बराच आप्त परिवार आहे.