आराध्या गंगाधर गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद,१०० च्या वर रुग्णांची आरोग्य तपासणी,५२ रुग्णाची नेत्र तपासणी,३० रुग्णाची रक्त तपासणी संपन्न

जि.प.प्रा. शाळेतील ४५ विद्यार्थ्यांनीही आरोग्य तपासणी व औषधी वाटप ….

हिमायतनगर तालुका प्रतिनिधी प्रशांत राहुलवाड

तालुक्यातील मौजे दिघी ग्रामपंचायत कार्यालय येथे दिनांक ०६-१०-२०२२ रोजी वार गुरुवार सकाळी ठिक ११:३० वाजता माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान व आराध्या गंगाधर गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये नेत्ररोग तपासणी व सर्व ज्येष्ठ नागरिकांची बि. पि. शुगर,वजन,रक्त, तपासणी,आणि मोफत औषधी उपचार व एन सी डी चे मोफत कार्ड वितरण करण्यात आले.मोफत नेत्र तपासणी,रक्त तपासणी तसेच गरोदर मातांना योग्य ते मार्गदर्शनही यावेळी केले गेले.यामध्ये वय वर्षे ३० च्या वर असलेल्या सर्व नागरिकांची मोफत तपासणी केल्या गेली.यावेळी जवळगाव चे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.मिजगर यांनी गरोदर माता यांना जेवण,राहणीमान व मानसिक आरोग्य याबाबत सविस्तर माहिती सांगत मार्गदर्शन केले.

दिघी येथील ग्रामपंचायत कार्यालयमध्ये सकाळी ११:३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे शिबीर पार पडले.यावेळी गावातील गरजू रुग्णांनी या सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घेतला.या आरोग्य शिबिरात १०० च्या वर रुग्णांची आरोग्य तपासणी,५२ रुग्णाची नेत्र तपासणी,३० रुग्णाची रक्त तपासणी करण्यात आली तसेच जि.प.प्रा. शाळेतील ४५ विद्यार्थ्यांचीही आरोग्य तपासणी व औषधी वाटप करण्यात आले आहे.हे सर्व रोग निदान शिबिर गंगाधर गणपत गायकवाड सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार यांनी आयोजित केला होता.

शिबिरात सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गायकवाड यांच्या कन्या आराध्या गायकवाड हिचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी शिबिरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल डॉ मिजगर,नाईक साहेब,सुहास फुलके,पोहरे,खंदारे मॅडम,विजय वाठोरे,प्रशांत राहुलवाड यांचा सन्मान करण्यात आला.
या मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबीरास यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या जवळगाव येथील समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ. मिजगर ,सुपरवायजर नाईक साहेब,पोहरे,नेत्रतज्ञ मोहमद फारूक ,रक्त तपासणीस सुहास फुलके,खिल्लारे मॅडम, गंगासागर गायकवाड, देवकाबाई सावते, महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका संघटक विजय वाठोरे,पत्रकार प्रशांत राहुलवाड तज्ज्ञ डॉक्टर,आरोग्य अधिकारी,गावातील महिला,वृद्ध व्यक्ती व डोळ्यांची समस्या असलेले रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.