ढाणकी शहरात इफ्तार पार्टीचे आयोजन


प्रतिनिधी:: प्रवीण जोशी
ढाणकी


भारत देश अनेक प्रांतांनी सर्वात मोठी लोकशाही आणि अनेक जातीपंथ येथे गुण्यागोविंदाने नांदत असतात. आणि इतर आजूबाजूच्या देशाला शांततेचा समतेचा व बंधुत्वाचा संदेश भारत देशाने नेहमीच दिला आणि ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती कृत्रिम संकटे आली त्या त्या वेळेस देशाने शेजारी असलेल्या इतर देशांना सढळ हाताने मदत केली. व जाती, धर्म, यापेक्षा सर्वात मोठा धर्म म्हणजे मानव धर्म हा संदेश दिला व देशाला फार मोठा थोर विचारवंतांचा वसा सुद्धा लाभला आहे त्या अनुषंगाने सर्वच धर्माची लोक नांदत असताना त्यांचा सण उत्सव मोठ्या प्रमाणात व शांततेत पार पडतोच आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ढाणकी शहरातील जामा मज्जिद मध्ये ईद सणानिमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. शहरात शांतता भाईचारा हा वृद्धंगीत होऊन सामाजिक ऐक्य राहून प्रगती होईल या मागचा बहुदा उद्देश या कार्यक्रमाला शहरातील अनेक तरुण मुले होतीच शिवाय बिटरगाव(बू) पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार प्रताप भोस, कपिल मस्के, मोहन चाटे,कुसराम, निलेश भालेराव, ढाणकी शहराचे उपनगराध्यक्ष जहीर भाई, अजिज खा पठाण, रमण रावते, संबोधी गायकवाड, व प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती लावली होती