खैरी येथील शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेत अमरावतीचा संजय पटेल प्रथम

राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव निमित्त ओम श्री गणेश मंडळ व खैरी ग्रामवस यांच्या वतीने शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील संजय पटेल यांनी प्रथम क्रमांक तर राळेगाव तालुक्यातील रोहित पिंपरे यांनी द्वितीय क्रमांक तर साहिल सरपते वरोरा यांनी तृतीय क्रमांक पटकावित मॅरेथॉन स्पर्धेत बाजी मारली.
सर्वप्रथमच यावर्षी नवीन स्तुत्य उपक्रम ओम श्री गणेश मंडळ यांनी राबवून खैरी गावात एक नवीन पायंडा ठेवला .यात सर्वप्रथम 19 फेब्रुवारी रविवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ग्रामपंचायत कार्यालयामधील शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर शिवदौ ड मॅरेथॉन स्पर्धा सुरू होण्यापूर्वी खैरी येथील निधी महाजन हिचे शिवगर्जना गायन त्यानंतर शिवदौड मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात यात अनेक दूर दूरवरच्या मॅरेथॉन स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यामध्ये प्रथम पारितोषिक २००१ रुपये अमरावतीच्या संजय पटेल, द्वितीय पारितोषिक१५०१ राळेगाव येथील रोहित पिंपरे तर तृतीय पारितोषिक १००१ वरोरा येथील साहिल सरपते यांनी पटकाविले.
शिव दौड मॅरेथॉन स्पर्धेसाठी ओम श्री गणेश मंडळ व खैरी ग्रामवासी यांनी अथक परिश्रम घेतले.