
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
राळेगाव येथील किराणा दुकानदार अशोक वर्मा यांच्या शेतात निघालेला २० क्विंटल कापूस असलेल्या गोडाऊन मध्ये भरून होता दिं २ जानेवारी २०२३ च्या मध्यरात्री चोरट्यानी गोडाऊनचे कुलूप तोडून लोखंडी शेटरच्या पट्या वाकवून गोडाऊन मध्ये असलेला २० क्विंटल कापूस चोरून नेल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की अशोक वर्मा यांचे शेत राळेगाव वरून तीन किलोमीटर अंतरावर ग्राम कृष्णापुर शिवारात जळका रोडवर ६ एकर शेती असून शेतात स्लॅबचे गोडाऊन होते या गोडाऊनमध्ये सहा एकरातील निघालेला २० क्विंटल कापूस भरून होता मात्र दिं २ जानेवारी २०२३ सोमवारच्या मध्यरात्री चोरट्यानी डाव साधला असून गोडाऊन मध्ये असलेला २० क्विंटल कापूस किंमत अंदाजे १ लाख ४० हजार रुपयांचा चोरून नेला असल्याची घटना घडली असून ही घडलेली माहिती शेता शेजारी असलेले शेत मालक गोविंद धोटे यांचे असल्याने धोटे हे सकाळी शेतात गेले असता त्यांना शेतात असलेल्या गोडाऊनचे शेटर उघडे दिसले तेव्हा धोटे यांनी गोडाऊनचे शेटर उघडे असल्याची माहिती वर्मा याना दिली असता अशोक वर्मा हे शेतात गेले त्यावेळी वर्मा याना गोडाऊन मध्ये असलेला कापूस चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले याबाबत वर्मा यांनी चोरी गेलेल्या कापसाची तक्रार राळेगाव पोलीस स्टेशनला दाखल केली असता घटना स्थळी पोलीस जमदार नितीन गेडाम यांनी जावून पाहणी केली असून चोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कापूस चोरट्याच्या दिशेने चक्रे फिरविली असून पोलिसांना चोरट्याना पकडणे मोठे आव्हानात्मक ठरणार आहे
