आजंती ग्रामपंचायत क्षेत्रात आदिवासी बांधवांसाठी निर्माण होणार समाज भवन..
रिमडोह ते शहालंगडी रस्त्याचे आ. कुणावारांचे हस्ते भूमिपूजन

प्रमोद जुमडे/ हिंगणघाट

हिंगणघाट दि.२३ सप्टेंबर
विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या ग्रामविकास निधीतून आज दि.२३ रोजी आजंती ग्रामपंचायत अंतर्गत रिमडोह ते शहालंगडी जाणाऱ्या जोड रस्त्याचे खडीकरण व मजबुतीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार समीर कुणावार यांचे हस्ते संपन्न झाले.
राज्य शासनाचे ग्राम विकास व पंचायत राज विभागाचे वतीने २५१५ अंतर्गत फॅमिली कट्टा हॉटेल ते शहालंगडी जाणाऱ्या रस्त्याचे सुमारे २० लक्ष निधीतून हे काम होणार आहे.
यासोबतच सिमेंट काँक्रिट व पेविंग रस्त्याचे १० लक्ष निधीतून महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत बांधकाम होणार आहे, आज सोमवार रोजी या रस्त्याचे विकासकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजनेंतर्गत रिमडोह येथील शासकीय भूखंडावरील आदिवासी समाज भवनाचे भूमिपूजन २० लाख रुपये निधीतून भूमिपूजन सोहळा आ. समिर कुणावार यांचे हस्ते संपन्न झाले. असे एकूण एक कोटी विस लक्ष रुपये निधी कामाचे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते भूमपूजन करण्यात आले..
यावेळी राजेश कोचर, दमडूजी मडावी, आजन्ती येथील सरपंचा सीमा देवडे, ग्रा.प.सदस्य प्रवीण पटेलिया, मारुती ढगे मनीषा गेडाम, माया आत्राम, त्रिशला कळमकर, अर्चना कोल्हे, प्रीतम कुमरे,रवी मानकर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता प्रशांत धमाने, सायली राऊत इत्यादी मान्यवर उपस्थित होते.