
सहसंपादक : रामभाऊ भोयर
राळेगाव तालुक्याचे भूमिपुत्र राहुल मेश्राम यांच्या पुढाकारातून
तालुक्यातील इयत्ता 10 वी आणि 12 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा व करियर मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक 31 मे रोजी स्व.भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव येथे आयोजित केला होता.
राळेगाव तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच अश्या भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले गेले होते.
कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलन व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर अतिथी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक राहुल मेश्राम यांनी केले त्यांनी हा कार्यक्रम घेण्यामागील उद्देश सांगितला.
तालुक्यातील
विद्यार्थांना प्रोत्साहन मिळावं , यांच्या मेहनतीच कौतुक व्हावं त्यांना पुढील करियर बद्दल मार्गदर्शन व्हावं हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे असे आपल्या भाषणातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रेमळ नवरंगे (अस्थिरोग तज्ञ) , डॉ. सोनाली नवरंगे MBBS, MS (Surgeon) , इंजिनियर अक्षय घावट साहेब,
प्राध्यापक श्री.आशिष कांबळे, ॲड. गोपाल चव्हाण , आटमुर्डी येथील जेष्ठ नागरिक श्री. मारोती मेश्राम
इत्यादी अतिथी तथा करिअर मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
त्यांनी विद्यार्थांना पुढील करियर बद्दल व करिअरच्या वेगवेगळ्या संधी या बद्दल योग्य माहिती दिली व मार्गदर्शन केले.
त्यानंतर इयत्ता 10 वी परीक्षेत तालुक्यातून पहिली आलेली कुमारी आकांक्षा कोहाड हिचा तिच्या आई वडिला सह सत्कार करण्यात आला, तसेच इयत्ता 12 वी कला शाखेतून तालुक्यातून पहिली आलेली कुमारी प्रतीक्षा खंडाळकर हिचा सुद्धा गौरवचिन्ह , प्रमाणपत्र, व पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला.
त्याच प्रमाणे तालुक्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील इयत्ता 12 वी उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी
कुमारी राखी आत्राम हिचा व तिच्या कुटुंबाचा सत्कार केला
कुमारी राखी आत्राम हिच्या पुढील शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ही राहुल मेश्राम यांनी घेतली आहे.
त्यानंतर इयत्ता 10 परीक्षेत 80% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या व इयत्ता 12 वी परीक्षेत 70% पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या आई वडिला सह गुणगौरव करण्यात आला
प्रत्येक विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह, प्रमाणपत्र, तसेच गुलाब पुष्प देऊन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या आई वडिलांचा पण सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमा करीता
कुमारी आकांक्षा वाघ, शिवानी भुडे, विकी माने, बळीराम मेश्राम, पवन आडे, कृष्णा मडावी, चंद्रभान कुळसंगे, श्री. कोवे सर , गंगाधर घोटेकर , यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन धम्मबोदी घायवटे यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हा सामाजिक उपक्रम प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणात आयोजित केला जाईल असे मत राहुल मेश्राम यांनी व्यक्त केले.
