
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषाबद्दल अवमानकारक विधान केले असून त्यांनी केलेल्या विधानावरून समाजाचे भावना दुखावले असून चंद्रकांत पाटील यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे निवेदन वंचित बहुजन आघाडी व समविचारी समाज संघटनेच्या वतीने दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोज सोमवारला जाहीर निषेध नोंदवून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रपुरुषाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे
गेल्या काही दिवसा सध्याच्या मंत्रिमंडळात विशेषता भाजप नेते हे पदाधिकारी जाणीवपूर्वक महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहे त्यामुळे बहुजनांच्या भावना दुःखावत असून अशा या बेजबाबदार व्यक्तीकडून महामानवाबद्दल असे वक्तव्य त्यांच्या तोंडून निघणे म्हणजे समाजामध्ये तेढ निर्माण करून समाज शांतता भंग करण्याचे कटकारस्थान आहे तेव्हा महापुरुषाबदल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी , भिम टायगर सेना तसेच अखिल भारतीय महात्मा फुले संघटना राळेगाव वतीने निवेदनातून देण्यात आला आहे असून निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडी टायगर भीमसेन तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समाज संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
