दि वसंत जिनींग ची निवडणूक तिहेरी होण्याची शक्यता,जय सहकार चा विजय रथ, मतांची दुफळी थांबविणार कि विजयश्री खेचून आणणार

.

नितेश ताजणे वणी

वणी विधानसभा क्षेत्रात निवडणूक आणी परिसरातील सर्व पक्षीय दिग्गज नेते त्यामुळे वणी येथील वसंत जिनिंग प्रेसिंगची निवडणूक राजकीय पटलावर चांगलीच रंगात आली आहे. यामध्ये चार पॅनल उभे ठाकले असुन, सहकार पॅनलने प्रचारात बाजी मारली आहे. सहकार पॅनलमध्ये समाविष्ट असेलेले सर्व उमेदवार स्वच्छ प्रतिमेचे व सामाजिक कार्यात अग्रेसर,असल्याने मतदारांची “सहकार पॅनल” ला मोठ्या प्रमाणात पसंती दिसून येत आहे. वसंत जिनिंग प्रेसिंगची निवडणूक परिसरातील घराघरात पोहचलेली श्री रंगनाथा स्वामी नागरी सहकारी पत संस्थाचे मागील पंधरा वर्षांपासून अध्यक्ष असलेले ॲड. देविदास काळे यांचं मॅजिक हेच खरं लॉजिक आहे, आणी जय सहकार चे प्रचाराची धुरा व योग्य नियोजन विजय भाऊंचा हातून होत असल्याने हा विजयी रथ विजयभाऊ मुळे विजयाच्या दिशेने जाताना दिसत आहे.

वसंत जिनिंग प्रेसिंग संस्थेच्या मालकीच्या ५ जिनिंग फॅक्टरी आहेत.यामध्ये संस्थेची २२.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. वसंत जिनिंगची यशस्वी वाटचाल पुढे सुरु ठेवण्याकरिता वसंत यामध्ये वणी विधान सभा क्षेत्रात शेतकरी हिताची संस्था असल्यामुळे हि निवडणूक आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी प्रतिष्ठेचि केली आहे. त्यांच्या पक्षाची संघटनात्मक बांधणी प्रत्येक कार्यकर्ते, पदाधिकारी घरोघरी जाऊनप्रचार करित आहे, तसेच उमेदवार सुद्धा जनमानसातील दिग्गज असल्यामुळे त्यांना विजयाची खात्री आहे.माजी आमदार वामनराव कासावर सहकार क्षेत्रातील दमदार उमेदवार सोबत घेऊन निवडणूक लढवत आहे. तसेच आक्रमक अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले वणी विधानसभा क्षेत्रात प्रभाव असलेले अनील हेपट या निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाल्याने ते कोणाचे गणित बिघडवतात यांकडे साऱ्याचं लक्ष लागले आहे.