
पोलिस स्टेशन राळेगाव दुर्गा उत्सव विसर्जन या सणाच्या अनुषंगाने, शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील यासाठी चोख बंदोबस्तासोबतच पोलिस निरीक्षक रामकृष्ण जाधव साहेब यांनी हद्दीतील सराईत अवैध दारु विक्रेते यांच्यावर कलम 144 (2) फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये हद्दपार प्रस्ताव तयार करून मंजुरीकामी मा.उपविभागीय पोलिस अधिकारी साहेब, पांढरकवडा यांच्याकडे पाठविले होते.सदर प्रस्तावाला मान्यता मिळाल्याने दिनांक 25/10/2023 व दिनांक 27/10/2023 या तीन दिवसांसाठी पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण 29 सराईत अवैध दारू विक्रेते यांना हद्दपार करण्यात आलेले आहे. तसेच दि 24/10/23 चे मध्यानंतर पोस्टे हद्दीतील सर्व मद्य विक्री आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत.
