
सहसंपादक: रामभाऊ भोयर
शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन सभा वरिष्ठांच्या मार्गदर्शनास्तव’जि.प.उ.प्रा.शाळा,
वनोजायेथे खालीलप्रमाणे-
बिनविरोध निवडीद्वारे पुनर्गठीत करण्यात आली
= नवनिर्वाचित समिती=
1)श्री.मोरेश्वरजी पंजाबराव वटाणे-अध्यक्ष
2(======)-सदस्य तथा ग्रा.पं.स.
3)श्रीमती रेखाताई गजाननजी बुरले-उपाध्यक्ष
4)श्री.ताराचंदजी उत्तमराव कोटनाके-सदस्य
5)सौ.संजिवनीताई प्रदीपजी खडके-सदस्या
6)सौ.नलिनीताई रविन्द्रजी फुलमाळी-सदस्या
7)श्री.मारोतीजी नारायणराव सोनटक्के-सदस्य
8)श्री.किशोरजी रमेशजी चिंचोणे-सदस्य
9)सौ.शितलताई सतिशजी आत्राम-सदस्या
10)श्री.दिनेशजी गुलाबराव गावंडे-सदस्य
11)श्री.सचिनजी भास्करजी काचोळे-सदस्य
12)सौ.अर्चनाताई सतिशजी सोनटक्के-सदस्या
13)श्री.प्रकाशजी कवडुजी नागोसे-सदस्य
14)श्री.सुनील भिमरावजी मेश्राम-शिक्षक प्रतिनिधी
15)श्री.गणेशजी गुलाबराव येटी- शिक्षण तज्ज्ञ
16)सौ.सविता वसंतराव उईके-सचिव तथा मुख्याध्यापिका.
जि.प.उ.प्रा.शाळा,वनोजा च्या वतीने शाळा व्यवस्थापन समिती चे स्वागत करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणिय श्री.सुनील भि.मेश्राम सर व प्रमुख पाहुणे येवती शाळेचे माजी मु.अ.आदरणिय श्री.घोडे सर व आदरणिय मुख्याध्यापिका सौ.उईके मॅडम तसेच आदरणिय सौ.तायडे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये शासन GR नुसार शा.व्य.स.पुनर्गठन सभा घेण्यात आली.
प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्ष तसेच मु.अ. शिक्षक व पालक वर्ग यांच्या स्वागतानंतर प्रास्ताविक भाषणामध्ये मु.अ.सौ.उईके मॅडम यांनी संपुर्ण विषय सभेत मांडले.त्यानंतर सौ.तायडे मॅडम अध्यापनातील अडचणी याविषयावर सभेत मत मांडले.यानंतर सदस्य निवडीकरिता श्री.मेश्राम सर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख पाहुणे श्री.घोडे सर यांनी GR नुसार सुरुवात करून वरीलप्रमाणे सदस्य निवडप्रक्रिया सदोष करण्यात आली.
यानंतर सदस्यांना त्यांच्या कर्तव्य व जबाबदारी विषयी सांगण्यात आले. समिती व शिक्षक ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे अशाप्रकारे जर वागले तर शाळेचा विकास होतोच हे 100%निश्चित आहे.
लोकसहभाग फुल नाही फुलाची पाकळी आवश्यक आहे यावर शाळापयोगी अत्यंत उपयुक्त असे विचार श्री.घोडे सरांनी सर्व पालकांसमोर मांडले.शाळेच्या विकासाच्या कामाचे विविध प्रस्ताव उईके मॅडमने मांडले ते कधीच आपण ऐकले नाही.अशा गोष्टीकरिता लोकसहभाग खूप महत्वाचा असतो. लोकसहभागातून जमा केलेल्या वर्गणीचे पैसे गावातील विदर्भ कोकण ग्रामीण बँक येथे अध्यक्ष/सचिव यांचे अकाउन्ट काढून जमा आहे ते उल्लेखनिय आहे.कारण व्यवहार सदोष राहतो. प्रथम मु.अ.व शिक्षक त्यानंतर सरपंच व समिती त्यानंतर शा.व्य.स.अध्यक्ष व समिती नंतर पालक व प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून लोकसहभाग कसा घ्यावा याविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यानंतर पालकांनी आपल्या मुलाला अभ्यासाला बसविणे व त्याचे विषयवार नियोजन कसे असावे याविषयी सखोल मार्गदर्शन केले.शाळेच्या विकासाविषयी समाधान व्यक्त केले.
त्यानंतर अध्यक्षिय भाषणात श्री.मेश्राम सर यांनी विचार मांडले.आपल्या शाळेचा विकास झपाट्याने होतो आहे याचे कारण गणित या विषयाला लाभलेले श्री. भोयर सर ,इंग्रजी मिडियमला लाभलेल्या सौ.तायडे मॅडम तसेच उईके मॅडमचं काम खरोखरचं अध्यापन व इतर शैक्षणिक काम उल्लेखनिय आहे मी तर एप्रिल महिण्यात जात आहो परंतु आपण सर्व पालक वर्ग अशा स्वछंदी,व्यवहारकुशल ,शाळेच्या विकासाचे प्रस्ताव मांडण्याची कला ,तन-मन-धनाने कार्य करणा-या व कृतीशील व्यक्तीमत्व असणा-या आपल्या मुख्याध्यापिका उईके मॅडम यांना पाठिंबा द्यायलाच पाहिजे.कारण शाळेला गावाचा आधार असावा व गावाला शाळेचा आधार असावा.
या सभेचे अध्यक्षस्थान व सभेची जबाबदारी दिल्याबद्दल मी शाळेच्या ऋणानुबंधणात आहो असे मत व्यक्त केले.
यानंतर निवडून आलेले सदस्य व प्रमुख पाहुणे आदरणिय श्री.घोडे सर व सर्व उपस्थितांचे आभार सौ.तायडे मॅडम यांनी मानले.व सदस्य निवडीचा कार्यक्रम येथे अध्यक्ष श्री.मेश्राम सर यांच्या परवानगीने संपला असे जाहीर केले.
यानंतर सर्वांनी स्वरुची भोजनाचा आस्वाद घ्यावा असे शाळेच्यावतीने आमंत्रित करण्यात आले. त्यानंतर एक तासानी अध्यक्षाची निवड केल्या जाईल असे सौ.उईके मॅडम यांनी सूचविले.
=अध्यक्ष निवड प्रक्रिया=
पालक तथा सरपंच श्री.प्रभाकरजी दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली
श्री. मोरेश्वरजी पंजाबराव वटाणे हे माजी अध्यक्ष त्यांनी शाळेला दिलेला वेळ व कार्य पाहून त्यांनाच अध्यक्ष ठेवावे असे सर्वानुमते ठरले असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सूचक -आदरणिय श्री.मारोती नारायणराव सोनटक्के.
अनुमोदक-श्री.चंद्रशेखरजी उगेमुगे पालक तथा ग्रामपंचायत सदस्य.
यानंतर श्रीमती रेखाताई गजाननजी बुरले यांची उपाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली .
सुचक-श्री.किशोरजी चिंचोणे.
अनुमोदक- श्री.दिनेशजी गावंडे.
अध्यक्ष निवड सभेचे संचालन व आभारप्रदर्शन उईके मॅडम यांनी केले चहापानानंतर सभेची सांगता करण्यात आली.
